सोलापूर महानगरपालिका उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 5 Months ago
मोफत संगणक प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात बोलताना मनपा पर्यवेक्षिका निलोफर सय्यद.
मोफत संगणक प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात बोलताना मनपा पर्यवेक्षिका निलोफर सय्यद.

 

सोलापूर महानगरपालिका उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणकाचे मूलभूत ज्ञान व्हावे, या प्रांजळ भावनेतून मोफत संगणक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याबरोबरच पटसंख्या वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे खादिमाने उर्दू फोरमचे अध्यक्ष विकार अहमद शेख यांनी सांगितले.

अशर-ए- उर्दू  २०२४ निमित्त खादिमाने उर्दू फोरम, सोलापूर च्या वतीने  सोलापूर महानगरपालिका ०६ शाळांतील इयत्ता ७ वी  च्या वर्गातील ३० विध्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोफत संगणक प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन मनपा पर्यवेक्षिका निलोफर सय्यद यांचा शुभ हस्ते करण्यात आले . 

प्रशिक्षण वर्गाच्या प्रारंभी अशमिजा डोका यांनी कुराण पठण केले. मनपा उर्दू  मुले १, मुले ५ , मुले ९, मुली ३, मुली ५ या शाळांतील विद्यार्थ्यांना त्यांचा शाळेतील शिक्षकांच्या उपस्थितीत प्रशिक्षण सुरु करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकार अहमद शेख होते. 

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे कोषाध्यक्ष नासिरूद्दीन आळंदकर यांनी केले. निलोफर सय्यद यांनी, त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणात, या उपक्रमाचे कौतुक केले. मनपाच्या विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण वर्गाचा लाभ मिळावा, यासाठी शिक्षण मंडळ सर्वतोपरी सहकार्य करेल. शहरातील सर्व मनपा शाळांना याबद्दल सूचना देण्यात येईल. जेणे करून मनपाच्या २०० विद्यार्थ्यांपर्यंत याचा लाभ पोहोचेल, असे आश्वासनही पर्यवेक्षिका निलोफर सय्यद यांनी दिले. 

याप्रसंगी मनपा उर्दू शाळेतील मुख्याध्यापिका सौ. नाजनिन कोरबू व उपशिक्षिका सौ. जहाँआरा नक्देकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अलिमोद्दीन दंडोती, महेर अफरोज, इम्रान अलमेलकर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक रफिक खान यांनी केले. शेवटी मो. हैदर आळंदकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

 - प्रकाश सनपूरकर, सोलापूर 
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

 

Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter