सानिया मिर्झाने कुटुंबियांसोबत अशी साजरी केली ईद

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Months ago
सानिया मिर्झा कुटुंबांसोबत ईद साजरी करताना
सानिया मिर्झा कुटुंबांसोबत ईद साजरी करताना

 

संपूर्ण देशभरात ११ एप्रिलला ईद साजरी केली. देशभरातील मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करताना केला. त्याचसोबत बॉलिवूड सेलिब्रिटी, खेळाडूदेखील ईद साजरी केली आहे. देशातील टेनिसपट्टू सानिया मिर्झादेखील आपल्या कुटुंबियांसोबत ईद साजरी केली. 'आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवण्यासाठी ईद हा सण आहे', असं सानिया मिर्झाने सांगितले आहे. 

सानिया मिर्झाने एका मुलाखतीत या वर्षीची ईद कशी साजरी करणार आहे, याबाबत माहिती दिली होती. सानियाने सांगितले की, 'याआधी कामानिमित्त मी सतत फिरत असायची. त्यामुळे ईदच्या दिवशी मी घरी नसायची. परंतु आता गेल्या काही वर्षांपासून मी माझ्या घरच्यांसोबत ईद साजरी करत आहे. यामुळे मला सणाचा खरा अर्थ आणि भावना समजल्या आहे. यावर्षी मी हैदराबादमध्ये माझ्या कुटुंबियांसोबत ईद साजरी केली. माझा मुलगा ईझानदेखील आमच्यासोबत ईद साजरी केली. यानिमित्ताने  ईझानला भारतातील वेगवेगळे सण, संस्कृती समजून घेता येईल , याचा मला जास्त आनंद आहे'.

सानियाने तिच्या लहानपणीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. 'लहानपणी आम्ही ईदीची खूप जास्त वाट पाहायचो. ईदच्या दिवशी पाहुण्यांकडून, घरातील मोठ्या व्यक्तींकडू मिळणारी ईदी ही खूप स्पेशल असायची. मी आता मोठी झाल्यामुळे मला जास्त ईदी मिळत नाही', असं तिने सांगितले.

सानियाने या वर्षी आपल्या कुटुंबियांसोबत ईद कशी साजरी केली याबाबत म्हणाली की, 'आम्ही सर्वप्रथम प्रार्थना करुन ईद साजरी केली. त्यानंतर आईवडिलांच्या घरी ईदसाठी बिर्याणी, शिर खुर्मा असे अनेक पदार्थ खाऊन, आम्ही १५- २० नातेवाईक एकत्र येऊन ईद साजरी केली. जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवण्यासाठी ईद ही उत्तम संधी आहे. मी हैदराबादमध्ये असते तेव्हा आम्ही संपूर्ण कुटुंबिय मोठ्या उत्साहात ईद साजरी करतो'.