ऑल इंडिया शारंग चषक कॅरम स्पर्धेत महम्मद आरिफची बाजी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
शारंग चषक कॅरम स्पर्धेतील विजेता महम्मद आरिफचा सत्कार करताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर, धनंजय महाडिक, सुनील देसाई, शारंगधर देशमुख, जयंत पाटील, सत्यजित कदम, अभिजित चव्हाण, विजय खाडे.
शारंग चषक कॅरम स्पर्धेतील विजेता महम्मद आरिफचा सत्कार करताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर, धनंजय महाडिक, सुनील देसाई, शारंगधर देशमुख, जयंत पाटील, सत्यजित कदम, अभिजित चव्हाण, विजय खाडे.

 

ऑल इंडिया शारंग चषक कॅरम स्पर्धा गेले तीन दिवस सुरू होत्या. स्पर्धेत उत्तर प्रदेशचा महम्मद आरिफ विजेता, तर महम्मद गुफरान उपविजेता ठरला. वसंतराव जयवंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांच्या वतीने संयुक्त कोल्हापूर कॅरम असोसिएशनने या स्पर्धेचे आयोजन केले होते. 

राजोपाध्येनगरमधील बॅडमिंटन हॉलमध्ये स्पर्धा झाल्या. स्पर्धेसाठी देशभरातील २६४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील अन्य विजेते असे इर्शाद अहमद (तिसरा), प्रशांत मोरे (चौथा), गुरुचरण तांबे (पाचवा) जैद अहमद (सहावा), राहुल सोळंकी (सातवा), संजय मांडे (आठवा).

यावेळी हर्षद गोठणकर, राहुल साळुंखे, ओमकार वडर, राजेश गोयल संजय मांडे यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक व शारंगधर देशमुख यांच्या हस्ते झाले. प्रसाद शेडे यांनी आभार मानले.