धोनीच्या तडाखेबंद खेळीने वानखेडे गाजवले

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 15 d ago
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स

 

चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा त्यांच्याच होम ग्राऊंडवर 20 धावांनी पराभव केला. मुंबईकडून रोहित शर्माने 105 धावांची शतकी खेळी केली. मात्र तरी देखील चेन्नईच्या 207 धावांचे आव्हान पार करताना मुंबईला 20 षटकात 6 बाद 186 धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईकडून पथिरानाने भेदक मारा करत 4 षटकात 28 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तर तुषार आणि मुस्तफिजूरने प्रत्येकी एक विकेट घेतली.

चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 207 धावांचे आव्हान ठेवले. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या मुंबईने सुरूवातीला चेन्नईच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला होता. मात्र कर्णधार ऋतुराज गायकवाड (69 धावा) आणि शिवम दुबे (नाबाद 66 धावा) यांनी डावाला गती देत तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी रचली. या दोघांच्या खेळीमुळे सीएसके 180 ते 190 धावांपर्यंत पोहचेल असं वाटत होतं. मात्र त्यानंतर शेवटच्या षटकात धोनीने 4 चेंडूत नाबाद 20 धावा ठोकल्या अन् चेन्नईला 206 धावांपर्यंत पोहवचलं.

रोहितचा शतकी धडाका तरी विजय मात्र चेन्नईचा
रोहित शर्माने 63 चेंडूत 105 धावांची शतकी खेळी केली. मात्र ही शतकी खेळी वाया गेली. चेन्नई सुपर किंग्जने सामना 20 धावांनी जिंकत गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. चेन्नईकडून पथिरानाने भेदक मारा करत 28 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.

पॉवर प्लेमध्येच रोहित अन् इशाननं दाखवली ताकद
मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जच्या 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दमदार सुरूवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी पहिल्या 6 षटकात 63 धावा चोपल्या. यात रोहितच्या 42 तर इशान किशनच्या 21 धावांचे योगदान होते.

धोनीचा दांडपट्टा अन् हार्दकसह मुंबई झाली घायाळ
डॅरेल मिचेल 14 चेंडूत 17 धावा करून बाद झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनी शेवटचं षटक खेळण्यासाठी आला. त्याच्या वाट्याला शेवटचे चार चेंडू आले होते. त्यातही त्याने हार्दिकच्या गोलंदाजीवर तीन षटकार आणि दोन धावा घेत 20 धावा कुटल्या. त्यामुळे सीएसकेने 20 षटकात 4 बाद 207 धावा केल्या.

कर्णधारानं घेतला कर्णधाराचा बळी
ऋतुराज गायकवाडने 40 चेंडूत 69 धावांची खेळी करत शिवम दुबेसोबत तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी रचली होती. या दोघांनी 16 व्या षटकात सीएसकेला 150 धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र ही जोडी कर्णधार हार्दिक पांड्यानं फोडली. त्याने ऋतुराजला 69 धावांवर बाद केलं.

ऋतुराजचं अर्धशतक अन् शिवमची फटकेबाजी
ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. ऋतुराजने अर्धशतक ठोकलं तर शिवम दुबे त्याला फटकेबाजी करत चांगली साथ देतोय. या दोघांनी सीएसकेला 14 षटकात 2 बाद 132 धावांपर्यंत पोहचवलं.

वानखेडेवर ऋतुराजची फटकेबाजी
चेन्नईने आज आपल्या सलामी जोडीत बदल केला होता. अजिंक्य रहाणे सलामीला तर ऋतुराज तिसऱ्या क्रमांकावर आला. रहाणे स्वस्तात बाद झाल्यानंतर ऋतुराजने धडाकेबाज फलंदाजी करत संघाची मंदावलेली धावगती वाढवली. सीएसकेने 5 षटकात 38 धावा केल्या.

मुंबई इंडियन्सविरूद्धच्या एल क्लासिको सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने एक बदल केला आहे. तिक्षाणाच्या ऐवजी पथिराना संघात आला आहे. मुंबईची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना थोडी मदत करते. त्यामुळे हा बदल करण्यात आला असावा.

हार्दिक पांड्यानं जिंकली नाणेफेक
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पांड्याने आपल्या विनिंग कॉम्बिनेशनमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला. सेम टीम ठेवत त्यानंं धोनीचाच वारसा पुढे चालवला.

मुंबईचे 'हे' ४ खेळाडूं चेन्नईकडून खेळणार
खरं तर, देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणारे शिवम दुबे, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे आणि शार्दुल ठाकूर हे आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जच्या संघात आहेत. या खेळाडूंना आज सीएसकेच्या प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

गेल्या सामन्यातही हे खेळाडू चेन्नईच्या प्लेइंग 11 चा भाग होते. चेन्नई सुपर किंग्ज सध्या दुखापतींशी झुंजत आहे. संघाचे वेगवान गोलंदाज मथिसा पाथिराना आणि दीपक चहर जखमी झाले आहेत.

दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड
मुंबई इंडियन्स आणि चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स हे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहेत. दोघांच्या नावावर 5-5 ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम आहे. आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघांमध्ये एकूण 36 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये 20 सामने मुंबई इंडियन्सच्या नावावर आहेत. त्याचवेळी चेन्नईने 16 विजय मिळवले आहेत.

वानखेडेवर पुन्हा महेंद्रसिंह धोनी महात्म्य
षटकार ठोकून भारताला २०११ मध्ये एकदिवसीय विश्वकरंडक जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमवर आपल्या षटकारांचा जलवा दाखवला, त्यामुळे दोनशे पार धावा करणाऱ्या चेन्नईने आयपीएल सामन्यात मुंबईचा २० धावांनी पराभव केला. मुंबईच्या रोहित शर्माने नाबाद शतक केले; पण इतरांची साथ त्याला मिळाली नाही. 

आपला २५०वा आयपीएल सामना खेळत असलेला धोनी अखेरचे चार चेंडू असताना मैदानात आला आणि सलग तीन षटकारांसह त्याने ५००च्या स्ट्राईक रेटने नाबाद २० धावा केल्या. हार्दिक पंडपाच्या या अखेरच्या षटकांत २६ धावा फटकावण्यात आल्या त्याच मुंबईच्या मुळावर आल्या.

त्या अगोदर ऋतुराज गायकवाड (६९) आणि शिवम दुबे (६६) यांची टोलेबाजी चेत्राईचा डाव भक्कम करणारी होती. काही दिवसांपूर्वी बंगळूरविरुद्ध १९६ धावांचे आव्हान पार करणाऱ्या मुंबईसाठी २०७ धावांचे लक्ष्य कठीण - नव्हते; पण त्यांच्या मार्गात पचिराना आला २८ धावांत चार विकेट मिळवून त्याने चेत्रईचा विजय सोपा केला. द्विशतकी धावांचा पाठलाग करण्यासाठी पॉवर प्लेच्या सहा षटकांत किमान १० धावांची सरासरी आवश्यक असते. रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामीवीरांनी ६३ धावा फटकावल्या.

सात षटकांत ७० अशी आश्वासक वाटचाल होत असताना मलिंगाप्रमाणे तिरकस शैली असलेला पचिराना गोलंदाजीस आला आणि त्याने तीन चेंडूत इशान व सूर्यकुमार यांना बाद केले. सूर्यातर शून्यावर बाद झाला.

एक बाजू सांभाळत अर्धशतक करणाऱ्या रोहित शर्माने नंतर तिलक वर्मासह डाव सावरत मुंबईचे आव्हान कायम ठेवले होते; परंतु पचिराना आपल्या दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीस आला आणि त्याने तिलक वर्माला बादच केले नाही तर मुंबईच्या डावाला ब्रेक लावला. तिलक बाद झाल्यानंतर पुढच्या १० चेंडूत अवघ्या चार। धावाच मुंबईला करता आल्या आणि त्यात हार्दिकचौही विकेट गमावली, त्यामुळे २४ चेंडूंत ७२ धावांची गरज असे समीकरण तयार झाले. तेथूनच मुंबईचा संघ पाठीमागे पडला. 

चेन्नई संघ व्यवस्थापनाने आज सलामीच्या जोडीत बदल केला. कर्णधार ऋतुराज गायकवाडऐवजी अजिंक्य रहाणेला सलामीला पाठवले. डावाच्या पहिल्या षटकात मोहम्मद नबोला त्याने चौकार मारून आक्रमकता दाखवली खरी; परंतु त्या पुढे तो जाऊ शकला नाही. कोएल्झीच्या एका आखूड टप्प्याच्या चेडूवर तो बाद झाला. 

दुसरा सलामीवीर राचिन रवींद्र यालाही पॉवर प्लेचा फायदा घेता येत नव्हता; परंतु तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ऋतुराजच्या पवित्र्यामुळे चेन्नईच्या धावगतीत चांगली प्रगती व्हायला लागली. कोएत्झीच्या दुसऱ्या पटकात त्याने दोन चौकार आणि एका षटकारासह १४ धावा वसूल केल्या. 

राचिन रवींद्र १६ चेडूत २१ धावा करून बाद झाला असला, तरी चेत्रईने १० षटकांत दोन बाद ८० धावांपर्यंत मजल मारली होती. चेत्रईसाठी हुकमाचा एक्का ठरत असलेल्या दुबेने डावाच्या उत्तरार्धात सफाईदारपणे टोलेबाजी केली. रोमारिओ शेफर्डच्या एका षटकांत तब्बल २२ धावा फटकावण्यात आल्या. यात ऋतुराज गायकवाडने आपले अर्धशतक ३३ चेंडूत पूर्ण केले; तर ही अर्धशतकी मजल दुबेने २८ चेंडूत पूर्ण केली.

संक्षिप्त धावफलक चेत्रई २० षटकांत २० षटकांत ४ बाद २०६ (ऋतुराज गायकवाड ६९, शिवम दुबे नाबाद ६६, महेंद्रसिंह धोनी नाबाद २०) विजयी वि. मुंबई इंडियन्स २० षटकांत ६ बाद १८६ बावा (रोहित शर्मा नाबाद १०५, एम. पचिराना ४/२८).