करंडकासह रोख रक्कम स्वीकारताना फैजान सीसीचा कर्णधार हाजी जाकिर बागवान. शेजारी नदीम बागवान, सईद बागवान, मुश्ताक बागवान, रईस बागवान व विजयी संघाचे खेळाडू
जळगावच्या भुसावळ येथील बागवान जमात सातारा व बागवान युवा फाऊंडेशन यांच्या विद्यमाने हाजी जाकीर बागवान यांनी टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या सहकायनि आयोजित केलेल्या डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट अंतिम सामन्यात फैजान सीसीने अबूबकर सीसी संघावर १४ धावांनी मात करून विजेतेपद पटकाविले.
शहरातील साकेगाव महामार्गावरील टर्फमध्ये झालेल्या या स्पर्धेत बागवान जमातच्या बारा संघांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा युट्यूबवर लाईव्ह ह दाखविण्या दाखविण्यात आली. साखळी पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत अंतिम सामना फैजान सीसी व अबूबकर सीसी यांच्यात झाला. ज्यात फैजान सीसीने १४ धावांनी हा सामना जिंकत बागवान प्रीमियर लीग सीजन- २ वर आपले नाव कोरले.
अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच उमेर बागवान, बेस्ट बॅट्समन सुफियान बागवान, मॅन ऑफ द सिरीज बबलू बागवान, बेस्ट बॉलर साकीब बागवान बागवान यांना देण्यात आले. स्पर्धेत अंतिम सामना जिंकणाऱ्या फैजान सीसी संघाला ११ हजार व चषक सईद हाजी बशीर बागवान यांच्याहस्ते देण्यात आला. उपविजेता अबूबकर संघाला ५ हजार रोख मुश्ताक हाजी मुसा बागवान यांच्याहस्ते देण्यात आले. स्पर्धेचे आयोजन हाजी जाकिर बागवान, साजिद बागवान, नदीम बागवान यांनी केले होते.