"भारत आमचा जवळचा मित्र, पण रशियन तेल खरेदीमुळे शुल्क लावले," मार्को रुबिओंचे विधान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ

 

"भारत हा अमेरिकेचा एक अत्यंत जवळचा भागीदार आहे, पण युक्रेन युद्धासाठी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर केलेल्या कारवाईचा भाग म्हणून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवी दिल्लीवर रशियन तेल खरेदी केल्याबद्दल अतिरिक्त शुल्क लादले आहे," असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी मंगळवारी सांगितले.

'गुड मॉर्निंग अमेरिका' या कार्यक्रमाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुतीन यांच्यावर कारवाई करण्याची "वारंवार धमकी" दिली, पण नंतर त्या धमक्यांपासून माघार घेतली, या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

"मला वाटते की त्यांनी (ट्रम्प यांनी) कारवाई केली आहे. उदाहरणार्थ, आम्ही भारतावर अतिरिक्त शुल्क लादले आहे - आणि ते आमचे खूप जवळचे भागीदार आहेत - आणि कालच त्यांच्यासोबत आमची पुन्हा बैठक झाली. याचा संबंध त्यांच्या रशियन तेलाच्या खरेदीशी आहे," असे रुबिओ म्हणाले.

जेव्हा त्यांना सांगण्यात आले की, ही रशियावर कोणतीही थेट कारवाई नाही, तेव्हा रुबिओ यांनी अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्या विधेयकाचा संदर्भ दिला. हे विधेयक "रशियाकडून तेल आणि वायू खरेदी केल्याबद्दल भारत आणि चीनवर शुल्क लावण्याबद्दल" होते, असे ते म्हणाले.