IPL 2024 : कोलकाताच्या विजयानंतर शाहरुख झाला भावूक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 28 d ago
शाहरुख खान कुटुंबासोबत
शाहरुख खान कुटुंबासोबत

 

काल झालेल्या आयपीएल फायनल मध्ये शाहरुख खानच्या के के आर टीमने बाजी मारली. कोलकत्ता नाईट रायडर्स ने सनरायझर्स हैदराबादला धूळ चारत त्यांचा सपशेल पराभव केला.

सोशल मीडियावर एस आर के च्या विजयाचा व्हिडिओ चांगलाच वायरल झालाय आणि नुकतंच त्यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर गाजतोय. शाहरुख खान सोबत त्याचा संपूर्ण कुटुंब या मॅचला उपस्थित होतं. त्याच्या मित्रमंडळीनीही मॅचला खास हजेरी लावत टीमला सपोर्ट केला.

मॅजिक आज शाहरुख खान आणि त्याची मुलं इमोशनल झालेली पाहायला मिळाली शाहरुखच्या लेखीने सुहानाने शाहरुखला मॅच जिंकल्यावर मिठी मारली आणि तिच्या डोळ्यात पाणी होतं तर शाहरुख ही काहीसा भाऊ झाला होता त्यानंतर अब्राहम ने सुद्धा शाहरुखला मिठी मारली त्याच्या डोळ्यातही पाणी होतं जिंकल्यानंतर खान कुटुंबाने काही काळ एकत्र येत हा आनंद साजरा केला सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय

काही दिवसांपूर्वी शाहरुखची तब्येत बिघडली होती. डीहायड्रेशन मुळे शाहरुखला आमदाबाद मध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. तब्येत खराब असतानाही शाहरुखने फायनल ला आवर्जून हजेरी लावत त्याच्या टीमला सपोर्ट केला आणि टीम जिंकल्यानंतर त्यांच्या सेलिब्रेशन मध्ये सुद्धा तो सहभागी झाला इतकच नाही तर संपूर्ण ग्राउंडला सहकुटुंब फेरी मारत त्याने उपस्थित प्रेक्षकांचे आभार मानले शाहरुखच्या या कृतीच सध्या सोशल मीडियावर कौतुक होतंय

अशी जिंकली मॅच
चेन्नईत झालेल्या या अंतिम सामन्यात कोलकाता संघाने हैदराबादच्या टीमचा 8 विकेट्सनी पराभव करत शानदार विजय संपादन केला. आयपीएल फायनलमध्ये आतापर्यंतच्या सर्वात कमी धावसंख्येचा पाठलाग करताना केकेआरने 57 चेंडू राखत सामना पूर्ण केला. 2012 मध्ये ज्या मैदानावर केकेआरचा संघ चॅम्पियन बनला त्याच मैदानावर त्यांनी तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवलं.

सगळ्यात जास्त विजेतेपद मिळवणारी ही आयपीएलमधील तिसरी टीम ठरली आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन टीमने यांनी पाच वेळा ट्रॉफीज जिंकल्या आहेत.