मोहम्मद शमीवर यशस्वी शस्त्रक्रिया

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Months ago
मोहम्मद शमी
मोहम्मद शमी

 

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी यानं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हॉस्पिटलच्या बेडवरचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याच्या हाताला सलाईन आणि नाकामध्ये नळ्या घातलेल्या दिसत आहेत. या फोटोंमुळं त्याच्या चाहत्यांना चिंता वाटू शकते पण घाबरण्याचं कारण नाही, असं खुद्द त्यानंचं म्हटलं आहे. 

शमीनं ट्विट करुन दिली माहिती
शमीनं आठ तासांपूर्वी ट्विट करुन आपल्यावर ऑपरेशनबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर ट्विटमध्ये म्हटलं की, "आज माझ्या टाचेवर यशस्वी ऑपरेशन झालं आहे. आता यातून बरं व्हायला काही काळ जाणार आहे. पण पुन्हा माझ्या पायावर उभं राहण्यास उत्सुक आहे"

 

हे ट्विट करताना त्यानं हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेल्या अवस्थेतील चार फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याला सलाईन आणि नाकतून नळ्या लावल्याचं दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोत त्यानं थम्स अप करत आपण आता ठीक आहोत, असं म्हटलं आहे. 

 

दरम्यान, शमी यंदाच्या आयपीएलमधून बाहेर असल्याचं कारणही आता स्पष्ट झालं आहे. यामुळं गुजरात टायटन्सला मोठा झटका बसला आहे. भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतही तो खेळू शकला नाही. गेल्यावर्षी नोव्हेंबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे वर्ल्डकप फायनलमध्ये तो शेवटचा खेळला होता. जखमी असतानाही वर्ल्डकपमध्ये शमीनं शानदार कामगिरी केली होती. त्यानं ७ सामन्यांमध्ये २४ बळी घेतले होते. गोलंदाजी करताना करताना पाय खाली टेकवताना त्याला त्रास होत होता.