अंडर १९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये धमाकेदार कामगिरी करणारा मुशीर खान

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 2 Months ago
मुशीर खान फोटो
मुशीर खान फोटो

 

अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कप चा सामना रविवारी पार पडला, हा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. भारतावर मात करत ऑस्ट्रेलियाने हा सामना ७९ रणांनी जिंकला. भारत-ऑस्ट्रेलियाच्या या अति-टतीच्या सामन्यात भारताने पूर्णपणे सामना जिंकण्याचा प्रयत्न केला. 

फायनल मध्ये जाऊन भारत उपविजेता संघ ठरला असला तरी, या सामन्यात भारताकडून खेळणाऱ्या खेळांडुमध्ये सर्वाधिक चर्चेतील राहिलेले नाव आहे मुशीर खान. मुशीर खान हा अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन बनविणाऱ्या टॉप ३ फलंदाजापैकी दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.  

मुंबईचे क्रिकेटर नौशाद खान हे मुशीरचे वडील आहेत, तर नुकतेच भारतीय क्रिकेट संघात सहभागी झालेल्या सरफराज खान यांचा लहान भाऊ आहे. याबाबत नौशाद सांगतात की, "दोन्ही मुले भारतीय क्रिकेट संघात खेळून भारताचे नाव उज्ज्वल करत आहेत ही अभिमानास्पद गोष्ट आहे." 

अंडर १९ विश्वकप मध्ये सर्वाधिक रन बनविणारे खेळाडू:
१. उदय सहारण (भारत): ६ मॅच- ३८९ रन- ६४.८३ सरासरी -७८.९० स्ट्राइक रेट, 
२. मुशीर खान (भारत): ६ मॅच- ३३८ रन- ६७.६० सरासरी - १०१.२० स्ट्राइक रेट, 
३. सचिन धस (भारत): ६ मॅच- २९४ रन- ७३.५० सरासरी -११६.६७ स्ट्राइक रेट,
४. लुआन-ड्रे प्रीटोरियस (दक्षिण आफ्रिका): ६ मॅच- २८७ रन- ५७.४० सरासरी - ९४.१० स्ट्राइक रेट,
५. जेमी डंक (स्कॉटलैंड): ४ मॅच - २६३ रन- ६५. ७५ सरासरी - ७०. ८९ स्ट्राइक रेट. 

कोण आहे मुशीर खान: 
मुंबईचा मुशीर खानने विविध वयोगटामध्ये मुंबई क्रिकेटचे प्रतिनिधित्व केले आहे. मुशीरने वयाच्या १६व्या वर्षी प्रथम श्रेणीमध्ये (एफसी) पदार्पण केले, अगदी लहान वयातच वडील नौशाद खान यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेऊन मुंबईसाठी खेळण्यास सुरुवात केली. मुशीरचा मोठा भाऊ सरफराज खान जो, येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघात पदार्पण करणार आहे, सरफराज आणि मुशीर यांचा सराव त्यांचे वडील नौशाद दररोज, न चुकता, नित्य-नियमाने घेत. फलंदाज म्हणून खेळणाऱ्या मुशीरने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी तीन एफसी मॅच खेळून, ५ डावात ९६ रन बनवले. 

मुशीरने त्याच्या एफसी करियरमध्ये दोन विकेटही मिळविल्या आहेत. मुशीरला अंडर १६ क्रिकेटमध्ये सुरवातीला थोडा संघर्ष करावा लागला, पण नंतर, मेहनत जिद्द आणि सरावावर लक्ष देऊन त्याने अंडर १९मध्ये स्थान निर्माण करून, अंडर १९ क्रिकेट वर्ल्डकप मध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. मुशीरने ४ डावात ३२५ रन बनवून, शिखर धवन नंतर ICC U१९ क्रिकेट वर्ल्डकप मध्ये शतक बनवणारा दूसरा खेळाडू ठरला आहे. फलंदाजी सोबतच मुशीरने गोलंदाजी करत ४ मॅच मध्ये ४ विकेटही घेतल्या आहेत. भाऊ सरफराज खानप्रमाणे मुशीरही सध्या आंतरराष्ट्रीय संघात स्थान निर्माण करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. 
 
अधिक जाणून घेऊया मुशीर खानच्या करकीर्दीबद्दल:
१. २७ फेब्रुवारी २००५ रोजी जन्मलेल्या मुशीर खान हा २०२४ आईपीएल नीलामी मध्ये विकत घेण्यात आलेल्या सर्वात कमी खेळाडू पैकी एक आहे. आयपीएल नलामीमध्ये १९ वयोगटाखालील १८ खेळाडूंमध्ये मुशीर खान हा एक खेळाडू आहे. 
  
२. मुशीरचे वडील नौशाद खान हेही मुंबईतील क्रिकेट खेळाडून आणि कोच आहेत. 

३. मुशीरचा मोठा भाऊ सरफराज आयपीएल मध्ये रॉयल चैलेंजर्स बैंगलोर, पंजाब किंग्स और दिल्ली कैपिटल्स या संघासाठी खेळला आहे. 

४. अंडर १९ सोबतच मुशीरने रणजी क्रिकेट ट्रॉफीसाठी मुंबई संघाकडून तीन मॅच खेळले आहे. त्याने पाच डावात ९६ रन बनवले आहे. यासोबतच मुशीर डाव्या हाताने गेंदबाजी करून दोन विकेट घेतल्या आहेत. मुशीर आणि पृथ्वी शॉने एकत्र डावाची सुरुवात करून क्रमश: ४२ आणि ३७९ रन बनवले, मुंबई संघाने हा डाव १२८ रनने जिंकला. 

५. मुशीरने नुकतेच भारत ए अंडर- १९साठी चतुष्कोणीय श्रृंखलाच्या फायनलमध्ये फक्त ४७ चेंडूत १२७ बनविले. अंडर-१९ वीनू मांकड़ ट्रॉफी स्पर्धेमध्ये ४३८ रन बनवून सर्वात जास्त रन बनविणाऱ्या खेळाडू पैकी चौथ्या नंबरवर स्थान मिळवले. यासोबतच २२ विकेट घेऊन सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीतही स्थान मिळवले.  

६. सूर्यकुमार यादव, अजिंक्य रहाणे व यशस्वी जैस्वाल सारख्या मोठ्या खेळांडूसोबत या आधीच खेळल्यामुळे मुशीरला सीनियर भारतीय टीमचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.
 
(अनुवाद: सौरभ चंदनशिवे) 
- मलिक असगर हाशमी