महिलांना मोफत बसप्रवासासाठी मूळ ओळखपत्राची गरज नाही

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

बंगळूर : राज्य सरकारच्या ‘शक्ती’ योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांसाठी मोफत बसप्रवास रविवारी सुरू केला आणि त्यांना मोफत प्रवासासाठी ओळखपत्र दाखवावे लागेल, असे सांगण्यात आले. पण मूळ ओळखपत्र दाखवायचे की झेरॉक्स असा संभ्रम होता.

 

त्यामुळे राज्याच्या अनेक भागात ओळखपत्राच्या मुद्द्यावरून वाहक आणि महिला प्रवाशांमध्ये वाद झाला. काही ठिकाणी मारामारीही झाली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या परिवहन विभागाने सोमवारी प्रत दाखवून बसमधून मोफत प्रवास करता येणार असल्याचे स्पष्ट केले.

 

तुम्हाला मूळ ओळखपत्र हवे किंवा फोटोकॉपी (झेरॉक्स) पुरेशी आहे? हा सर्व गोंधळ आता संपुष्टात आले आहे. ओळखपत्राबाबत परिवहन विभागाने एक दुरुस्ती आदेश जारी केला असून आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्राची झेरॉक्स प्रत असली तरी प्रवासाला परवानगी आहे. तसेच तुमच्याकडे हार्ड आणि सॉफ्ट कॉपी असली तरीही तुम्ही मोफत प्रवास करू शकता.