वंदे भारत ट्रेनची कमान महिलेच्या हातात!

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव
आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव

 

मुंबई: आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी आज सोलापूर ते सीएसएमटी ही वंदे भारत एक्स्प्रेस चालवून मध्य रेल्वेच्या शिरपेचात पहिली महिला वंदे भारत एक्स्प्रेस लोको पायलट म्हणून नाव कोरले.
 
 
सुरेखा यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक आठवर सत्कार करण्यात आला. या वेळी त्या म्हणाल्या, की नवीन काळातील, अत्याधुनिक तंत्रज्ञान वंदे भारत ट्रेनचे सारथ्य करण्याची संधी दिल्याबद्दल मी रेल्वप्रती कृतज्ञ आहे. गाडी योग्य वेळी सोलापूरहून निघाली आणि वेळेच्या पाच मिनिटे आधीच सीएसएमटीला पोहोचली. ट्रेन चालवणे शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सिग्नल पाहणे, नवीन उपकरणे वापरणे, इतर कर्मचाऱ्यांसह समन्वय ठेवणे, ट्रेन चालवण्यासाठी सर्व नियम पाळणे यांचा समावेश असतो. ते सर्व प्रशिक्षण उपयोगी येत असते. महाराष्ट्रातील सातारा येथील सुरेखा यादव या १९८८ मध्ये भारतातील पहिली महिला रेल्वे चालक बनल्या. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे