पुन्हा एकदा भूकंपाने हादरला अफगाणिस्तान

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 29 d ago
अफगाणिस्तान भूकंप
अफगाणिस्तान भूकंप

 

अफगाणिस्तान पुन्हा एकदा जोरदार भूकंपाने हादरला आहे. अफगाणिस्ताना आज पहाटे भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ इतकी मोजली गेली आहे. स्थानिक वेळेनुसार पहाटे ५.४४ च्या सुमारास हा भूकंप झाला. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

NCS च्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू सुमारे 124 किमीच्या खोलीवर होता. या महिन्याच्या सुरुवातीलाच अफगाणिस्तानमध्ये ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. त्यावेळी भूकंपाचे केंद्र सुमारे 169 किमीच्या खोलीवर होते.

अफगाणिस्तान हा भूकंप संवेदनशील क्षेत्र आहे. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. ज्यामुळे अनेक गावे उद्ध्वस्त झाली होती.

अफगाणिस्तानमध्ये हा भूकंप सर्वात विनाशकारी भूकंपांपैकी एक होता. या नैसर्गिक आपत्तीमध्ये जवळपास २००० नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर हजारो नागरिक जखमी आणि बेघर झाले होते. अनेक महिने लोटले तरी लोक पुन्हा सुरुवात करण्यासाठी धडपडत आहेत.