चीनी ब्रॉडबँडची '10-G'ला गवसणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 7 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

चीनने इंटरनेट तंत्रज्ञानात इतिहास रचला आहे. हवेई प्रांतातील सुनान शहरात चीनने पहिली टेन-गिगाबाईट (टेनजी) ब्रॉडबँड सेवा सुरू झाली. यामुळे नागरिकांना अतिवेगवान इंटरनेट मिळणार आहे. जगात उपलब्ध असलेल्या इंटरनेटपेक्षा हा वेग कित्येक पटींनी जास्त आहे.

हुवेई आणि चायना युनिकॉम या दोन दिग्गज कंपन्यांनी मिळून हे तंत्रज्ञान विकसित केलं. चीनच्या डिजिटल विश्वात हा मोठा टप्पा आहे. त्यांनी ‘फिफ्टीजी पॅसिव्ह ऑप्टिकल नेटवर्क’ (पीओएन) आधारित ही सेवा तयार केली. जगातील पहिलं व्यावसायिक टेन-गिगाबाईट ब्रॉडबँड नेटवर्क असं याचं नाव आहे. यात डाउनलोडचा वेग तब्बल ९,८३४ एमबीपीएस आहे. अपलोडिंगचा वेग एक हजार आठ एमबीपीएस आहे. सध्याच्या इंटरनेटने मिनिटं लागणारी कामं आता सेकंदात होतील. उदाहरणच द्यायचं तर, २० जीबीचा फोर-के चित्रपट डाउनलोड करायला साधारण सात ते दहा मिनिटं लागतात. पण टेनजी नेटवर्कने हेच काम फक्त २० सेकंदात होईल.

काय आहे खास?
टेनजी तंत्रज्ञान भविष्याला आकार देणार आहे. व्हर्च्युअल रिअॅलिटी, ऑगमेंटेड रिअॅलिटी, क्लाउड गेमिंग, स्मार्ट सिटी आणि स्वयंचलित वाहनांसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे. या सर्व गोष्टींसाठी जलद आणि अखंड इंटरनेट हवं. टेनजीमुळे हे शक्य होणार आहे.

जागतिक प्रभाव
चीनच्या या पावलाने इतर देशांना विचार करायला भाग पडलं आहे. आता त्यांना आपल्या इंटरनेट सेवेत सुधारणा करावी लागेल. डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये चीन आता जगात आघाडीवर आहे. इंटरनेटचा वेग आणि त्यावर अवलंबून असलेल्या गोष्टी कशा बदलू शकतात, याचा आदर्शच त्यांनी घालून दिला आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter