वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यंदाच्या नोबेल शांतता पुरस्काराच्या निवडीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. मानवाधिकार तज्ज्ञ नावी पिल्लई यांना जाहीर झालेला हा पुरस्कार 'लाजीरवाणा' असून यामुळे नॉर्वे देशावर कधीही न पुसणारा डाग पडल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
न्यूयार्कमधील एका सभेत बोलताना ट्रम्प यांनी नोबेल समितीच्या निर्णयावर कडक शब्दांत टीका केली. आपल्याला या पुरस्कारासाठी निवडले जाणे अपेक्षित होते, असा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला. जानेवारी २०२५ मध्ये व्हाइट हाऊसमध्ये पुनरागमन केल्यापासून आपल्याला नोबेल शांतता पुरस्कार मिळावा, अशी आपली इच्छा असल्याचे ट्रम्प यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे.
दरम्यान, युद्धगुन्हे आणि मानवताविरानाविरुद्धच्या लढ्याबद्दल दक्षिण आफ्रिकेच्या न्यायाधीशा आणि मानवाधिकार तज्ज्ञ नावी पिल्लई यांना यंदाचा प्रतिष्ठित नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र, ट्रम्प यांनी हा निर्णय राजकीय प्रेरित आणि पक्षपाती असल्याचे म्हटले आहे. पिल्लई यांनी आपल्या भाषणात या पुरस्काराचा काही हिस्सा ट्रम्प यांच्यासोबत शेअर करण्याबाबत मजेशीर टिपण्णी केली होती, ज्याचीही चर्चा रंगली आहे.