न्यूज रूममधील सर्वजण पळाले, अँकर मात्र तिथेच!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 8 Months ago
सोशल मीडियावर वृत्तवाहिनीचा व्हिडिओ होतोय व्हायरल
सोशल मीडियावर वृत्तवाहिनीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

 

इस्लामाबाद (पीटीआय) : पाकिस्तानात भूकंपामुळे नऊ जण मृत्युमुखी पडले असून शंभराहून अधिक जखमी झाले आहेत. या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असून भूकंपग्रस्तांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यादरम्यान, आणखी एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून तो एका वृत्तवाहिनीचा आहे. भूकंपामुळे न्यूज रुम हलत असतानाही एका वृत्त निवेदकाने न घाबरता बातम्या देणे सुरू ठेवले. त्याच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

पेशावरच्या पश्‍तो भाषेतील स्थानिक टिव्ही चॅनेल महश्रिक टिव्ही (Mahshriq TV) वृत्तनिवेदक हा काल रात्री भूकंपाची बातमी देत होता. त्याचवेळी भूकंपाचे तीव्र धक्के बसले. या भूकंपाने कॅमेरा देखील हालला आणि स्टुडिओतील सर्व वस्तू हालताना रिकार्ड झाले. त्या स्थितीतही वृत्त निवेदक हा बातम्या देत होता. ही बाब अनेक प्रेक्षकांनी स्थानिक लोकांनी टिव्हीवर पाहिली. व्हिडिओत दिसते, की वृत्त निवेदक हा बातम्या वाचतो आणि यादरम्यान त्याच्या मागील न्यूज रूम भूकंपाच्या धक्क्याने हलताना दिसते. धक्के बसत असतानाही वृत्त निवेदक हा धाडसाने बातम्या वाचत होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वृत्त निवेदकाच्या धाडसाचे कौतुक होत आहे. भूकंपानंतर या वृत्तनिवेदकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.