संयुक्त राष्ट्राच्या सभेत भारताने पाकला झापले

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 5 Months ago
संयुक्त राष्ट्राच्या सभेत बोलताना काँग्रेस नेते राजीव शुक्ला
संयुक्त राष्ट्राच्या सभेत बोलताना काँग्रेस नेते राजीव शुक्ला

 

संयुक्त राष्ट्रात पुन्हा एकदा पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुनावणीत पाकिस्तानने काश्मीरविषयी चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यावर टीका करताना शुक्ला म्हणाले की, पाकिस्तान सातत्याने खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवत आहे, परंतु जमिनीवरील वास्तव वेगळेच आहे.

राजीव शुक्ला यांनी X वर पोस्ट करत म्हटले की, "UN मध्ये आज काश्मीरबाबत चर्चा करताना, पाकिस्तानी शिष्टमंडळ खोटी माहिती पसरवत आहे. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडेच झालेल्या मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीत जनतेने विक्रमी मतदान केले आहे, हे त्यांना लक्षात घ्यावे." त्यांनी पाकिस्तानला आवाहन केले की, भारताविरोधात खोटी माहिती पसरवण्याऐवजी पाकिस्तानने अधिक रचनात्मक दृष्टिकोन स्वीकारावा.

 

शुक्ला यांनी सांगितले की, "भारत संयुक्त राष्ट्रांच्या चुकीच्या माहितीविरोधातील मोहिमेला कायम पाठिंबा देईल."