सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशिया या देशांचा दौरा हा दहशतवादाविरोधातील लढ्यात दिलेल्या दृढ पाठिंब्याबद्दल आभार मानण्याची संधी असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. तीन देशांच्या दौऱ्यावर निघण्याआधी पंतप्रधान मोदीनी हे प्रतिपादन केले. 'ऑपरेशन सिंदूर 'नंतरच्या पहिल्या परदेश दौऱ्यावर गेलेले मोदी सायप्रसमध्ये पोहोचले असून लार्नाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडॉलिडेस यांनी त्यांचे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सायप्रसमध्ये आगमन झाल्यानंतर सायप्रसचे अध्यक्ष निकोस डॉलिडेस यांनी रविवारी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. दिल्लीहून सायप्रस्रला रवाना होताना माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदींनी हा परदेश दौरा भारतासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. मोदी म्हणाले, "तीन देशांचा दौरा हा सीमापार दहशतवादाविरोधातील लढ्यात भागीदार देशांनी दिलेल्या दृढ पठिंब्यावरत आभार मानण्याची संधी आहे. दहशतवादाच्या सर्व प्रकारांवर आणि स्वरूपांवर उपाय शोधण्यासाठी जागतिक पातळीवर जाणीव निर्माण करण्याचाही हा एक प्रयत्न आहे." सायप्रसच्या अध्यक्षांनी दिलेल्या निमंत्रणावरुन मोदी येथे आले आहेत. सायप्रस हा भूमध्य सागरी क्षेत्रातील आणि युरोपीय महासंघातील भारताचा निकटचा मित्र व महत्याचा भागीदार देत आहे. या भेटीत ऐतिहासिक संबंध दूड करण्याची आणि व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा, तंत्रज्ञान तसेच जोशील परस्पर संबंध वाढवण्याची संधी मिळणार असल्याचे मोदी म्हणाले.
'जी-७'मध्ये सहभागी होणार
सायप्रसहून पंतप्रधान मोदी कॅनडात सुरू झालेल्या 'जी-७' गटाच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी यासाठी मोदींना निमंत्रण दिले होते. यावेळी जागतिक स्तरावरील महत्त्वाचे मुहे आणि दक्षिण जगाच्या दृष्टीने असलेले प्राधान्यक्रम याबाबत चर्चा व विचारमंथन करण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली. १८ जून रोजी पंतप्रधान मोदी क्रोएशियाला जातील. या देशाला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरतील.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter