आवाटी गावाने दिले मुस्लिम समाजाला नेतृत्व

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
आवाटी ग्रामपंचायतीत परवीन खान सरपंच, तनवीर शेख उपसरपंच
आवाटी ग्रामपंचायतीत परवीन खान सरपंच, तनवीर शेख उपसरपंच

 

आवाटी (ता. करमाळा) ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडीमध्ये सरपंचपदी जगताप, पाटील व बागल गटाच्या परवीन खान यांची तर उपसरपंचपदी तनवीर आदम शेख यांची निवड झाली आहे. ही निवड आवाटी येथील ग्रामपंचायत कार्यालयात झाली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सालसे येथील मंडलाधिकारी अमित कुमार कलटवाड यांनी काम पाहिले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर ठरल्याप्रमाणे अडीच अडीच वर्षे सरपंच व उपसरपंच निवडीनुसार नव्यानेच परवीन खान यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी तनवीर शेख यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी सर्व गटांचे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

ही निवड पार पाडण्यासाठी आवाटी येथील ग्रामसेवक कुलदीप दौंड, पोलिस पाटील अनिल लोंढे, हवालदार बराटे, पोलिस उपनिरीक्षक पाखरी, माजी सरपंच साबीर खान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नसरुल्ला खान, वि. का. सोसायटीचे चेअरमन राजू खान, माजी उपसरपंच संतोष सोनवर, मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गोकूळ नलावडे तसेच जगताप, पाटील व बागल गटाचे सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.