USA-IRAN WAR: अमेरिकेचे इराणच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले, आखातात अमेरिकेच्या तळांवर इराणचे क्षेपणास्त्र हल्ले

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 11 h ago
इरबिल: अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अधिक तीव्र; अमेरिकेचे इराणच्या लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले तर इराणचे आखातात अमेरिकी लष्करी ठिकाणांना लक्ष्य.
इरबिल: अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अधिक तीव्र; अमेरिकेचे इराणच्या लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले तर इराणचे आखातात अमेरिकी लष्करी ठिकाणांना लक्ष्य.

 

इरबिल

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आता अधिक टोकाला पोहोचला आहे. सलग तेराव्या रात्री अमेरिकेने इराणच्या लष्करी ठिकाणांवर जोरदार बॉम्बफेक केली असून, प्रत्युत्तरात इराणने पर्शियन आखातातील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. दोन्ही देशांकडून माघार घेण्याचे कोणतेही संकेत मिळत नसल्याने पश्चिम आशियात युद्धाचा वणवा आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील अमेरिकी दूतावासांनी अमेरिकन नागरिकांना सावध राहण्याचे आणि परिसर सोडण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी अमेरिकेच्या धमक्यांसमोर झुकणार नाही, असे स्पष्ट करत चीन आणि रशियासोबत वाटाघाटी सुरू असल्याचे सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या सुरू असलेली वाटाघाटी अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले असले तरी, युद्ध संपवण्याची कोणतीही घाई नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आखातात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले

इरबिल शहरात अमेरिकी सल्लागारांच्या ठिकाणाजवळ स्फोटांचे आवाज ऐकण्यात आले असून, सुरक्षा अधिकाऱ्यांनी पाच स्फोटक ड्रोन्स पाडल्याचे सांगितले. तसेच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने कुवेतमधील उदैरी येथील अमेरिकेच्या तळावर आणि बहरीनमध्ये नौदल तळावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. प्रत्युत्तरात अमेरिकेने इराणच्या क्वेष्म बेट, इस्फहान आणि ख्युझेस्तान प्रांतातील लष्करी व नौदल तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनी बंद राहिल्याने जागतिक बाजारात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर हजारो खलाशी समुद्रात अडकले आहेत.