विरोधी पक्षनेते राहुल गांधी मंगळवारपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर, दिशा (DISHA) बैठकीचे करणार अध्यक्षपद भूषवणार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 50 m ago
राहुल गांधी दोन दिवसांच्या रायबरेली दौऱ्यावर
राहुल गांधी दोन दिवसांच्या रायबरेली दौऱ्यावर

 

रायबरेली 

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी मंगळवारपासून आपल्या दोन दिवसांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. पक्षाच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोनदिवसीय दौऱ्याची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, राहुल गांधी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत आणि स्थानिक विकासकामांचा आढावा घेणार आहेत.

दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राहुल गांधी शहरातील प्रभू टाऊन येथे सराफा व्यापाऱ्यांची भेट घेतील. त्यानंतर ते सेंट्रल बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबतच खेळाडू, वैद्यकीय व्यावसायिक आणि केमिस्टच्या शिष्टमंडळाशी भुएमऊ गेस्ट हाऊसमध्ये चर्चा करणार आहेत. जिल्हा विकास समन्वय आणि प्राधिकरणाच्या (DISHA) बैठकीचे अध्यक्षपदही ते भूषवणार असून प्रशासकीय पातळीवर या बैठकीची जय्यत तयारी सुरू आहे.

विकासकामांचे उद्घाटन आणि बैठकीचे आयोजन

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी राहुल गांधी आपल्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून (MPLADS) सुमारे ३ कोटी रुपये खर्च करून पूर्ण झालेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते जिल्हा विकास समन्वय आणि प्राधिकरणाच्या (DISHA) महत्त्वाच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवतील. यापूर्वी अमेठीचे खासदार किशोरी लाल शर्मा यांनी या समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले होते.