पंतप्रधान नरेंद्र मोदींची राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडॉलिडेस यांच्यासोबत गोलमेज बैठक.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रविवारी सायप्रसच्या राजधानी निकोसिया येथे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडॉलिडेस यांच्यासोबत व्यापार क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींसोबत गोलमेज बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीत त्यांनी भारत-सायप्रस सहकार्य व्यापार, गुंतवणूक आणि रक्षा क्षेत्रात नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत आणि सायप्रस यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये विकासाच्या अपार संभावना आहेत. हे सहकार्य केवळ आर्थिकच नव्हे, तर तांत्रिक आणि रणनीतिक दृष्ट्याही दोन्ही देशांना लाभदायक ठरू शकते.” २३ वर्षांनंतर सायप्रसला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान असलेले मोदी यांनी सांगितले, “२३ वर्षांनंतर एक भारतीय पंतप्रधान सायप्रसला आला आहे, आणि माझा पहिला कार्यक्रम हा व्यापार क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींसोबतची बैठक आहे. यावरून आर्थिक क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आमच्या संबंधांमध्ये किती महत्त्वाच्या आहेत हे स्पष्ट होते.”
या बैठकीत भारत आणि सायप्रस येथील अनेक कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. पंतप्रधानांनी त्यांना संबोधित करताना सायप्रसला “भारताचा विश्वासार्ह भागीदार” संबोधले आणि सांगितले की, अनेक भारतीय कंपन्या सायप्रसला युरोपचा प्रवेशद्वार मानतात.
सोशल मीडियावर या बैठकीची माहिती देताना पंतप्रधानांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले, “राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडॉलिडेस यांच्यासोबत व्यापारिक संबंध दृढ करण्यासाठी प्रमुख सीईओंसोबत रचनात्मक चर्चा झाली. नवोन्मेष, ऊर्जा, तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये अपार संभावना आहेत.” त्यांनी यावेळी गेल्या दशकात भारतात झालेल्या आर्थिक सुधारणा आणि व्यापार सुलभतेसाठी केलेल्या प्रयत्नांची माहितीही सामायिक केली.
आर्थिक आणि तांत्रिक क्षेत्रांतील सहकार्यावर विशेष भर देण्यात आला. यात खालील क्षेत्रांचा समावेश होता:
-
गुंतवणूक आणि वित्तीय सेवा
-
फिनटेक, स्टार्टअप्स आणि नवोन्मेष
-
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), माहिती तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक्स
-
रक्षा, कनेक्टिव्हिटी, नौवहन आणि गतिशीलता
-
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जैस्वाल यांनी या कार्यक्रमाच्या छायाचित्रांसह टिप्पणी केली, “गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि व्यापार संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने सार्थक चर्चा झाली.”
पर्यटन क्षेत्रातही सहकार्याची शक्यता पंतप्रधानांनी अधोरेखित केली. ते म्हणाले, “सायप्रस हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, आणि भारतही पर्यटन गंतव्यस्थानांच्या विकास आणि व्यवस्थापनावर काम करत आहे. यामुळे भारतीय आणि सायप्रसच्या टूर ऑपरेटरांमधील सहकार्य अत्यंत लाभदायक ठरू शकते.”
या भेटीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे UPI सेवेचा शुभारंभ. भारताच्या राष्ट्रीय भुगतान निगम (NPCI) आणि सायप्रसच्या युरोबँक यांच्यात सीमापार डिजिटल पेमेंट (UPI) सेवांसाठी एक सहकार्य करार (MoU) झाला. पंतप्रधानांनी सांगितले की, “जगातील ५०% हून अधिक डिजिटल व्यवहार आज भारतात होतात, आणि UPI हे त्याचे प्रमुख कारण आहे. हा करार युरोप आणि भारताच्या GIFT सिटी यांच्यातील पहिल्या प्रकारचा उपक्रम आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना लाभ होईल.”
परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, पंतप्रधानांची ही भेट भारत आणि सायप्रस यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना गती देण्याचा प्रयत्न आहे. तसेच, यामुळे भारताचे भूमध्यसागरीय क्षेत्र आणि युरोपीय महासंघाशी संबंधही दृढ होतील. सायप्रसच्या लार्नाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्राध्यक्ष क्रिस्टोडॉलिडेस यांनी स्वतः पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter