मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या नवे सीईओपदी 'या'भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 1 Months ago
मायक्रोसॉफ्ट विंडोजचे नवे सीईओ पवन दावुलुरी
मायक्रोसॉफ्ट विंडोजचे नवे सीईओ पवन दावुलुरी

 

अमेरिकेतील सर्व मोठ्या कंपन्यांचे प्रमुख भारतीय वंशाचे आहेत. या भारतीय वंशाच्या सीईओंमध्ये अमेरिकन अर्थव्यवस्थेला चालना देण्याची आणि तिचे भविष्य बदलण्याची ताकद आहे. गेल्या वर्षी, FedEx चे संस्थापक आणि CEO फ्रेड स्मिथ यांनी एका निवेदनात म्हटले होते की भारतीय-अमेरिकनांनी अमेरिकन अर्थव्यवस्था आणि अमेरिका ताब्यात घेतली आहे. 

यातच आता आयआयटी मद्रासमधून शिक्षण घेतलेल्या पवन दावुलुरी यांना मायक्रोसॉफ्टमध्ये नवी जबाबदारी देण्यात आली आहे. आता ते मायक्रोसॉफ्टच्या विंडोज आणि सरफेसचे नवे बॉस असणार आहेत. यापूर्वी या विभागाचे प्रमुख असलेल्या पनोस पानाय यांच्यानंतर त्यांना हे पद मिळाले आहे. पनोस पानाय मायक्रोसॉफ्ट सोडून गेल्यानंतर त्यांनी Amazon कंपनी जॉईन केली आहे.

पवन दावुलुरी हे सरफेस सिलिकॉनचे काम पाहत होते. विंडोज विभागाचे प्रमुख मिखाईल पारखिन होते. मिखाईल पारखिनला नवीन नोकरीच्या शोधात आहेत. त्यानंतर दावुलुरी यांना विंडोज आणि सरफेसची जबाबदारी देण्यात आली आहे.

राजेश झा यांनी Microsoft AI संस्थेच्या स्थापनेनंतर Windows आणि Web Experiences (WWE) टीममधील संघटनात्मक बदलांबद्दल टीमला माहिती दिली.

पवन दावुलुरी कोण आहेत?
पवन दावुलुरी यांनी IIT मद्रास या प्रसिद्ध संस्थेतून पदवी प्राप्त केली आहे. पवन दावुलुरी हे जवळपास 23 वर्षांपासून मायक्रोसॉफ्टमध्ये काम करत आहेत. युनिव्हर्सिटी आणि मेरीलँडमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर ते मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाले.