नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) सीयूईटी युजी (CUET UG) २०२६ चे प्रवेशपत्र जाहीर केले आहे. कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट २०२६ देणाऱ्या उमेदवारांना 'cuet.nta.nic.in' या अधिकृत वेबसाईटवर थेट लिंक मिळेल.
सीयूईटी युजी २०२६ चे प्रवेशपत्र 'cuet.nta.nic.in' वर उपलब्ध झाले आहे. हे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची थेट लिंक खाली दिली आहे.
सीयूईटी युजी परीक्षा ११ ते ३१ मे २०२६ या काळात पार पडेल. ही परीक्षा संगणकावर आधारित (CBT) असेल. परीक्षेचे प्रत्येक सत्र ३ तासांचे असेल. एका सत्रात उमेदवाराला किमान १ आणि जास्तीत जास्त ३ विषयांची परीक्षा देता येईल.
हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांनी खालील सोप्या पद्धतीचा अवलंब करावा.
१. 'cuet.nta.nic.in' या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
२. होम पेजवर दिसणाऱ्या 'CUET UG Admit Card 2026' च्या लिंकवर क्लिक करा.
३. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. तिथे तुमची लॉग-इन माहिती भरा.
४. माहिती सबमिट केल्यानंतर तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
५. हॉल तिकीट तपासा आणि ते डाऊनलोड करून घ्या.
६. भविष्यातील संदर्भासाठी प्रवेशपत्राची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवा.
अधिकृत सूचनेनुसार, उमेदवारांनी स्वतःचा एक फोटो आयडी सोबत आणणे गरजेचे आहे. ऑनलाइन अर्ज भरताना अपलोड केलेला आणि प्रवेशपत्रावर नमूद केलेला फोटो आयडीच सोबत असावा. ओळख पुरावा म्हणून तो परीक्षा केंद्रावर दाखवावा लागेल.
अर्ज भरताना काही उमेदवारांचे लाईव्ह फोटो आणि आधार कार्डवरील फोटो जुळले नव्हते. काहींनी इतर ओळखपत्रांचा वापर करून नोंदणी केली होती. अशा उमेदवारांनी एक विशेष मूळ प्रमाणपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र मुख्याध्यापक, प्राचार्य किंवा प्रथम श्रेणी राजपत्रित अधिकाऱ्याकडून साक्षांकित केलेले असावे.
तहसीलदार, महसूल अधिकारी, एसडीएम, डीएम किंवा भारतीय दूतावासातील प्रथम श्रेणी अधिकारी (अनिवासी भारतीयांसाठी) यांच्याकडून हे प्रमाणपत्र साक्षांकित करून घेता येईल. ७ एप्रिल २०२६ च्या 'एनटीए'च्या सूचनेनुसार या प्रमाणपत्राचे स्वरूप ठरवून दिलेले आहे. परीक्षेच्या दिवशी प्रत्यक्ष पडताळणीसाठी हे प्रमाणपत्र परीक्षा केंद्रावर दाखवावे लागेल.
यासंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी 'सीयूईटी युजी'च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.