GSEB SSC Result 2026: गुजरात बोर्डाचा इयत्ता १० वीचा निकाल जाहीर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (GSHSEB) ६ मे रोजी इयत्ता १० वी अर्थात एसएससी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवर आपला सीट नंबर टाकून गुण पाहता येतील. 'gseb.org' आणि 'result.gseb.org' या वेबसाईटवर निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. गुजरात बोर्डाचे निकाल, पुरवणी परीक्षा आणि अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

निकाल कसा पाहायचा?

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. होमपेजवर दिसणाऱ्या इयत्ता १० वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करावे. तिथे सीट नंबर टाकल्यानंतर तुमची गुणपत्रिका स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी विद्यार्थ्यांनी ही गुणपत्रिका डाऊनलोड करावी किंवा तिचा स्क्रीनशॉट काढून ठेवावा.

याशिवाय व्हॉट्सॲपवरही निकाल मिळवण्याची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ६३५७३००९७१ (6357300971) या नंबरवर आपला परीक्षा सीट नंबर पाठवावा. यासोबतच 'डिजीलॉकर' (DigiLocker) पोर्टलवरही एसएससी निकालाची लिंक लवकरच सक्रिय केली जाईल.

यंदा ८३.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

यंदा इयत्ता १० वीचा निकाल ८३.८६ टक्के लागला आहे. गुजरात बोर्डाच्या इयत्ता १० वीच्या परीक्षा २६ फेब्रुवारी ते १६ मार्च या कालावधीत पार पडल्या. यंदा गुजरातमधील १७०१ केंद्रांवरून तब्बल ९ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.