अशर-ए-उर्दू (उर्दू भाषा संवर्धन) पंधरवाड्यात विशेष पुस्तिकेचे अनावरण करताना मान्यवर.
सोलापूर : येथील खदिमाने उर्दू फोरमच्या वतीने अशर-ए-उर्दू (उर्दू भाषा संवर्धन) पंधरवाड्यानिमित्त कृत्रिम बुध्दीमत्ता विषयावर शिक्षकांसाठी परिसंवाद घेण्यात आला. कृत्रिम बुध्दीमत्ता विषयाचे तज्ञ आसीम फारुक सय्यद (मुंबई) यांनी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार फारूक सय्यद होते.
बालभारतीचे माजी अधिकारी नवेदुलहक खान यांनी सांगितले की, "शिक्षकांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. त्याशिवाय विद्यार्थी पुढील काळात अधिक चांगली कामगिरी करु शकणार नाहीत." तर, साहित्यिक डॉ. कासीम इमाम यांनी म्हणाले की, "जो समाज काळाबरोबर चालणार नाही तो मागे पडणार. त्यासाठी नवे तंत्रज्ञान स्विकारण्याची गरज आहे."
खालिद शेख (मलेशिया) यांनी सांगितले की, "कुत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग सर्वांगीन विकासासाठी व्हावा. शैक्षणिक क्षेत्रात हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे." दरम्यान, डॉ. अखलाक वडवान यांनी सोशल शिक्षण संकुलात कृत्रीम बुध्दीमत्तेचा उपयोग केला जाईल असे जाहीर केले. यावेळी विशेष पुस्तिकेचे अनावरण तसेच विषय अध्यापनावर प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यानंतर असीम सय्यद यांनी शंकाचे निराकरण केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला खलील शेख यांनी कुराण पठन केले. फोरमचे अध्यक्ष विकार अहमद शेख यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचे स्वागत संचालक अन्वर कमिशनर यांनी केले. तर, खजीनदार नासिरूद्दीन आळंदकर यांनी सूत्रसंचालन केले. परिसंवादासाठी समन्वयक रफिक खान, अलिमोद्दीन दंडोती, सुलतान जाणवाडकर, इम्रान अलमेलकर यांनी सहकार्य केले. वसिम सय्यद यांनी आभार मानले.
- प्रकाश सनपूरकर, सोलापूर