बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान आपल्या आगामी चित्रपट ‘सितारे जमीन पर’मधून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २०२२ मधील ‘लाल सिंह चड्ढा’नंतर हा आमिर पडद्यावर पुनरागम चित्रपट आहे. हा चित्रपट टॉम हँक्सच्या ‘फॉरेस्ट गम्प’चा रिमेक आहे. ‘सितारे जमीन पर’ हा आमिरच्या दिग्दर्शकीय पदार्पणातील ‘तारे जमीन पर’चा सिक्वेल आहे.
नुकतचं या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधून चित्रपटाची हृदयस्पर्शी कथा समोर आली आहे. आमिर खान या चित्रपटात एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसणार आहे.
कोर्टवरील वरिष्ठाशी वादानंतर दारू पिऊन गाडी चालवल्याच्या गुन्ह्यात अटक होतो. न्यायाधीश त्याला शिक्षा म्हणून विशेष गरजा असलेल्या मुलांच्या बास्केटबॉल संघाला प्रशिक्षण देण्याचे आदेश देतात. सुरुवातीला नाखूष असलेला हा कोच हळूहळू आपल्या खेळाडूंशी भावनिक बंध जोडतो आणि त्यांना राष्ट्रीय स्पर्धेत विजय मिळवून देण्यासाठी झटतो. ही कथा दंडाला संधीत आणि निराशेला आशेत बदलण्याचा प्रेरणादायी प्रवास आहे.
‘सितारे जमीन पर’मध्ये आमिर खानसोबत दहा नवोदित कलाकार दिसणार आहेत. आरौश दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, समवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशिष पेंडसे, ऋषी शहाणी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर. याशिवाय, अभिनेत्री जेनेलिया डिसुझ आमिरच्या प्रेमिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात नव्या आणि अनुभवी कलाकारांचा संगम प्रेक्षकांना एक अनोखा अनुभव देईल.
या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘शुभ मंगल सावधान’ फेम आर.एस. प्रसन्ना यांनी केले आहे. तर कथा आणि पटकथा दिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे. आमिर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटातील गाणी शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केली असून, गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी शब्दांना साज चढवला आहे. पार्श्वसंगीत राम संपत यांनी दिले आहे.
‘सितारे जमीन पर’ २० जून २०२५ ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना लिहिले, “एक बास्केटबॉल कोच, १० तुफानी सितारे आणि त्यांचा प्रवास.”
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter