अभिनेत्री मुमताज यांनी केला अक्षय कुमारबद्दल मोठा खुलासा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 d ago
अभिनेत्री मुमताज आणि  अभिनेता अक्षय कुमार
अभिनेत्री मुमताज आणि अभिनेता अक्षय कुमार

 

अक्षय कुमार लवकरच ‘हाऊसफुल ५’ आणि ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांना भेटणार आहे. आपल्या अभिनयाबरोबरच तो फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे. नुकत्याच एका मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी अक्षयने त्यांना दिलेल्या फिटनेस सल्ल्याबद्दल खुलासा केला.

बॉलीवूड अभिनेत्री मुमताज या गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी मुलाखतीत अनेक कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. आता त्यांनी अक्षय कुमारने त्यांना फिटनेसबाबत काय सल्ला दिला होता, याबद्दल वक्तव्य केले आहे.

७७ वर्षीय मुमताज यांनी एका रेडिओला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या फिटनेसबाबत वक्तव्य केले. मुमताज म्हणाल्या, “मी जेवणाबाबत नियम पाळते. मी जास्त खात नाही. मी चुकीच्या गोष्टी खात नाही. मी भरपूर व्यायाम करते, माझ्या चेहऱ्याची, केसांची काळजी घेते. चेहऱ्यावर लावण्यासाठी मी स्वत: मास्क तयार करते. योग्य वेळेत योग्य गोष्टी खाण्याला मी प्राधान्य देते.

मुमताज यांनी पुढे त्यांचा दिनक्रम कसा असतो यावर वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, “मी दररोज रात्री ९-१० च्या दरम्यान झोपते आणि सकाळी ४-५ दरम्यान उठते. सकाळी ७ पर्यंत मी व्यायाम करते. त्यानंतर ब्लॅक कॉफीचे सेवन करते. त्यानंतर मी थोडासा नाश्ता करते. त्यानंतर दुपारचे जेवण करते. मी रात्री जेवत नाही. मी फक्त काही फळे खाते.”

रात्री न जेवण्याचा सल्ला अक्षय कुमारने दिल्याचा खुलासा करत मुमताज म्हणाल्या, “अक्षय कुमार एकदा मला म्हणाला होता. ५-६ वाजल्यानंतर काहीही खाऊ नका. ती गोष्ट मी त्याच्याकडून शिकते.”