'आवाज- द व्हॉईस'च्या 'आवाज रेडिओ-हिंदी' चे पॉडकास्टमध्ये पदार्पण

Story by  test | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
Awaz the Voice hindi Podcast
Awaz the Voice hindi Podcast

 

नवी दिल्ली : आवाज- द व्हॉईसचे हिंदी पॉडकास्ट चॅनेल ‘आवाज रेडिओ-हिंदी’ला शनिवारी सुरुवात झाली. या पॉडकास्ट चॅनेलचे उद्घाटन भारताचे माजी राजदूत आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा उप-सल्लागार पंकज सरन यांच्या हस्ते करण्यात आले.
 
आवाज रेडिओच्या उद्घाटनप्रसंगी सरन म्हणाले, "तंत्रज्ञानाच्या युगात पॉडकास्ट हे एक नवीन माध्यम उपलब्ध झाले आहे. सर्वसमावेशक भारताच्या गोष्टी या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकतो."
  
ते पुढे म्हणाले, "नव्या पिढीपर्यंत योग्य संदेश पोहोचवण्यासाठी अशा प्रयत्नांची गरज आहे आणि आवाज रेडिओ हिंदीच्या माध्यमातून आवाज द व्हॉईसचा सकारात्मक संदेश त्यांच्यापर्यंत पोहचेल, अशी आशा आहे."
  
सर्वसमावेशक भारताच्या सकारात्मक बातम्या आवाज- द व्हॉईस आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून पाच भाषांमध्ये सादर करतो. आवाज द व्हॉईस इंग्रजी, हिंदी, उर्दू, आसामी या भाषांबरोबरच नुकत्याच लाँच झालेल्या मराठीतून देशाच्या संमिश्र संस्कृतीचे दर्शन घडवते. आता पुढचे पाऊल टाकून आवाज - द व्हॉईस हिंदीने ‘आवाज रेडिओ’च्या माध्यमातून एक नवीन व्यासपीठ उभे केले असून आता पॉडकास्ट चॅनल द्वारेही संवाद साधला जाणार आहे.
  
या चॅनलच्या माध्यमातून देशाच्या गंगा-जमुना संस्कृतीच्या गोष्टी रंजक पद्धतीने सांगितल्या जातील. सोबत समकालीन विषयांचे विश्लेषणही केले जाईल. यामुळे तरुण पिढीचे मनोरंजन तर होईलच, शिवाय त्यांच्यापर्यंत सकारात्मक आणि योग्य माहितीही पोहोचू शकेल. 
  
‘आवाज रेडियो’वर दररोज एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. आठवड्याचे कार्यक्रम आणि सादरकर्ते पुढीलप्रमाणे असतील -
   
सोमवारी - ‘जरा सोचिए’ – आवाज-द व्हॉईसचे मुख्य संपादक अतीर खान
मंगळवार – ‘तहजीब’ -राकेश चौरसिया
बुधवार -  मनजीत ठाकूर शो- मनजित ठाकूर 
गुरुवार –  शख्सियत - ओनिका माहेश्वरीसह
शुक्रवार - विशेष मुलाखत, संवाद
शनिवार- इंडिया इनदिनों आणि किस्सागोई(कथाकथन)
रविवार- मलिक असगर हाशमी ‘पुराने पन्ने’ आणि मुशायरा
 
 ‘आवाज रेडियो’ची पॉडकास्ट सेवा सर्व मोठ्या प्लॅटफॉर्म्सवर मोफत उपलब्ध आहे. Spotify वर ‘आवाज रेडियो’चे कार्यक्रम ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.