प्रियांकाने केले भूकंपग्रस्तांच्या मदतीचे आवाहन

Story by  vivek panmand | Published by  vivek panmand • 1 Years ago
प्रियांका चोप्रा आणि भुकंपग्रस्त
प्रियांका चोप्रा आणि भुकंपग्रस्त

 

 

व्हिडिओ शेअर करून व्यक्त केले दु:ख

 

तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंपाने संपूर्ण जग हादरले आहे. भूकंपात आतापर्यंत ३६ हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. भूकंपग्रस्तांच्या वेदनांनी संपूर्ण जग दु:खी झाले आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रानं नुकतंच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहे. प्रियंकाने आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले आहे. अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर करून दु:ख व्यक्त केले आहे. 


प्रियांकाने इंस्टाग्रामवर तुर्की आणि सीरियाच्या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रेस्क्यू टीम एका लहान मुलीला ढिगाऱ्यातून बाहेर काढताना दिसत आहे. हे दृश्य खरोखरच हृदय पिळवटून टाकणारे आहे. 


या व्हिडिओसोबत अभिनेत्रीने एक नोटही लिहिली आहे. प्रियांका चोप्राने लिहिले आहे की, ‘आठवड्याभरानंतरही त्या वेदना आणि अडथळॆ सीरिय आणि (Turkey Earthquake) तुर्कीतील जनतेसमोर उभेच आहेत.' 

 


 

तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंपाचा व्हिडिओ शेअर करत प्रियांकाने लिहिले की, "रेस्क्यू ऑपरेशन सुक्षण आले, जिथे ३ महिन्यांच्या बाळाला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले, तेथे अनेक लोक अजूनही अडकले आहेत. वाट पाहत आणि जगण्याची आशा बाळगून, त्यांचे कुटुंबीय चमत्कारासाठी प्रार्थना करत आहेत". "हे हृदयद्रावक आहे. 

 

प्रियांकाने लिहिले आहे की, 'निसर्गाचा कोप कोणालाही सोडत नाही, परंतु तळागाळात काम करणाऱ्या संस्थांचे तपशील माझ्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये आहेत. मला आशा आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारे मदत कराल. 


तुर्कस्तान आणि सीरियामध्ये ६ फेब्रुवारीला विनाशकारी भूकंप झाला होता. या भूकंपामुळे मोठी हानी झाली. या आपत्तीत आतापर्यंत हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच वेळी, ८० हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. 


अजूनही हजारो लोक ढिगाऱ्याखाली दबले जाण्याची भीती आहे. संपूर्ण जगाने तुर्कस्तान आणि सीरियाला मदतीचा हात पुढे केला आहे. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे.