पुण्याचा एम. सी स्टॅन ठरला बिग बॉस १६ चा विजेता

Story by  vivek panmand | Published by  vivek panmand • 1 Years ago
सलमान खानसोबत एम. सी. स्टॅन
सलमान खानसोबत एम. सी. स्टॅन

 

 स्पर्धा जिंकल्यानंतर त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. 

बिग बॉस 16 च्या कार्यक्रमात शिव ठाकरे आणि प्रियांका चहर चौधरी यांच्यासारख्या दिग्गज स्पर्धकांना मागे टाकून एम. सी. स्टॅनने विजेतेपद मिळवले आहे. त्याच्यानंतर शिव ठाकरे पहिला रनर अप आणि प्रियांका चाहर चौधरी हिने दुसरी रनर अप म्हणून स्थान मिळवले आहे. 


कलर्स वाहिनीवरील हा कार्यक्रम अबालवृद्धांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. जवळपास सहा महिने तो प्रक्षेपित केला जातो आणि शेवटी लोकसहभागातून एक विजेता घोषित करण्यात येतो. 


एम. सी. स्टॅनचे खरे नाव अल्ताफ शेख. पुण्यातील ताडीवाला झोपडपट्टीत तो राहायला होता. त्याचे बालपण अतिशय हालाखीत गेले. त्याला शिक्षणात गती नव्हती. मात्र लहानपणापासूनच त्याला संगीत आणि गायनाची आवड होती. वयाच्या १२ व्या वर्षीच त्याने कव्वाली गायला सुरुवात केली होती. पुढे त्याला रॅप या संगीत प्रकारात आवड निर्माण झाली. हळूहळू त्याने हिप हॉप गाण्यांच्या लेखनासोबतच दिग्दर्शनही केले. तडीपार हा त्याचा पहिला अल्बम होता. मात्र त्याला खरी प्रसिद्धी ‘रॅप वाटा’ या अल्बमनंतर मिळाली. त्या अल्बममध्ये त्याने सहकारी रॅपर एमिवे बंटाईची मस्करी केली होती. 


एम. सी. स्टॅनचे ‘शाना बन’ हे गाणे नुकतेच चार्टबस्टर ठरले. शिव मंडलीसोबत अतिशय चांगले संबंध होते. याशिवाय साजिद खान, अब्दुल रोझीक आणि शिव ठाकरे यांच्यासोबतही त्याची चांगली मैत्री होती. बिग बॉस स्पर्धेच्या काळात इतर स्पर्धकांसोबत तो संयमाने वागला. 


बिग बॉस स्पर्ध्येच्या अंतिम फेरीत गेल्यानंतर एम. सीला अनेक रॅपर्सनी पाठींबा दर्शवला होता. बिग बॉस स्पर्धा जिंकल्यानंतर त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. त्याला ३१ लाख ८० हजार रुपयांचा चेक आणि आलिशान गाडी भेट म्हणून देण्यात आली आहे.