इस्रायलसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमध्ये अटक करण्यात आली होती. हेरगिरीच्या आरोपाखाली या अधिकाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान भारतीय परराष्ट्र मंत्रालायाने सर्व ८ माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी विशेष प्रयत्न करत त्यांची सुटका केली.
या अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी अभिनेता शाहरुख खानने विशेष प्रयत्न केल्याचा दावा भाजप नेते आणि माजी राज्यसभा खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी केला. स्वामी यांच्या दाव्यावर शाहरूख खानने मौन सोडत दाव्यामागील सत्य माहिती दिलीय. नौदल अधिकाऱ्यांची सुटका करण्यात भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना चर्चेत अपयश आले होते. त्यानंतर कतारच्या प्रिन्ससोबत अभिनेता शाहरुख खानने चर्चा केली.
अधिकाऱ्यांच्या सुटकेत शाहरूख खानने महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेचे यश हे शाहरुखचे असून मोदी सरकारचे नसल्याचा दावा सुब्रम्हण्यम स्वामी यांनी सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म एक्सवर केला होता, त्यावर शाहरूख खानने प्रतिक्रिया दिलीय.
शाहरुख खानने त्याची मॅनेजर पूजा ददलानी मार्फत एक निवेदन जारी दाव्यावर प्रतिक्रिया दिलीय. या सर्व बातम्या अफवा आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. भारताचे नेत्यांनी केलेल्या मुत्सुद्देगिरीला यश आले आहे. कतारमधून माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका झाल्यानंतर सर्व भारतीयांप्रमाणे आपल्यालाही आनंद झाला असून सुखरूप घरी परतावे या सदिच्छा असल्याचे शाहरूख खानने आपल्या निवदेनात म्हटले आहे.