नेहमी आपल्या आपल्या बिनधास्त शैलीसाठी चर्चेत असलेली उर्फी जावेद आता एका नव्या विजयामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. अमेझॉन प्राइमवरील रिअॅलिटी शो 'द ट्रेटर्स'चा पहिला सीझन नुकताच संपला असून, अंतिम फेरीत उर्फीन प्रेक्षकांची मने जिंकत विजेतेपद पटकावले आहे.
विजयानंतर उर्फीने तिच्या संघर्षमय प्रवासाची आठवण करून देत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने बिग बॉसपासून ते 'द ट्रेटर्स' पर्यंतचा प्रवास उलगडताना मांडला आहे. "बिग बॉस'नंतर वाटलं होतं, आता काही चांगलं होणार नाही. कपडे विकत घेण्यासाठीही मित्रांकडून उधार घ्यावी लागली होती; पण स्वतःवर विश्वास ठेवला आणि कोण काय म्हणेल, याचा विचार न करता वाटचाल करत राहिले."
'द ट्रेटर्स मध्ये तिचा विजय फक्त नशिबाने नव्हता, तर ती एक नियोजनबद्धपणामुळे झाला आहे. "मी तीन ट्रेटर्स बाहेर केले, हे काही योगायोग नव्हते. शेवटपर्यंत टिकून राहणं आणि त्यातून विजय मिळवणं हाच माझा खरा उद्देश होता," असंही तिने यामध्ये सांगितले आहे. प्रत्येक वेळी ट्रोल होणारी उर्फी आता तिच्या मेहनतीमुळे नाव मिळवत आहे. उर्फी जावेदच्या या विजयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. 'द ट्रेटर्स'मधील तिचा प्रवास आणि कामगिरी प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. आता पाहावं लागेल, की या विजयानंतर उर्फीचा पुढील प्रवास कसा असणार आहे.