सरकारची 70,000 कोटींच्या शस्त्रास्त्र खरेदी प्रस्तावांना मंजुरी

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
सैन्याची वाढणार ताकद
सैन्याची वाढणार ताकद

 

संरक्षण मंत्रालयाने भारतीय संरक्षण दलांसाठी विविध शस्त्रास्त्र प्रणालींच्या खरेदीसाठी 70,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. संरक्षण अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली आहे.

या प्रस्तावांमध्ये भारतीय नौदलासाठी 60 मेड इन इंडिया युटिलिटी हेलिकॉप्टर मरीन आणि ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रे, भारतीय लष्करासाठी 307 ATAGS हॉवित्झर, भारतीय तटरक्षक दलासाठी 9 ALH ध्रुव हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रस्तावांना मंजुरीचा समावेश आहे.

एवढेच नाही तर या प्रस्तावांमध्ये HAL द्वारे निर्मित 60 UH सागरी हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी भारतीय नौदलासाठी 32,000 कोटी रुपयांची मेगा ऑर्डरचा देखील समावेश आहे.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सरकारने भारतीय नौदलासाठी ब्रम्होस मिसाईल, शक्ती EW सिस्टीम आणि युटिलिटी हेलिकॉप्टर (मरीन) मंजूर करण्यात आले आहेत. त्याची किंमत 56,000 कोटी रुपये असेल. भारतीय हवाई दलासाठीच्या SU-30 MKI विमानाासाठी लाँग रेंज स्टँड-ऑफ वेपनलाही मान्यता देण्यात आली.