वर्षभरात व्हॉट्सअ‍ॅपने 'इतक्या' कोटी भारतीय अकाउंट्सवर घातली बंदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Sameer Shaikh • 13 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

व्हॉट्सअ‍ॅपने मोठा खुलासा केला आहे. व्हॉट्सअ‍ॅप कंपनीने भारतात गेल्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यात एकूण ७ कोटी अकाउंट्सवर बंदी घातल्याची माहिती मासिक अहवालातून दिली आहे.

मेटा कंपनी सध्या लोकसभा निवडणुकीदरम्यान फसवणूक आणि बेकायदेशीर टेलीमार्केटिंगच्या अहवालाची चौकशी करत आहे. माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ अंतर्गत ही चौकशी सुरु आहे. कंपनीने मासिक अहवालातून या विषयाची माहिती जाहीर केली.

'मासिक अहवाल हा माहिती तंत्रज्ञानाच्या नियमानुसार प्रसिद्ध केला जाते. या अहवालात व्हॉट्सअ‍ॅपने भारतात केलेल्या कारवाईची माहिती आहे. व्हॉट्सअ‍ॅपकडे भारतीय युजर्सकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. भारतीय कायदे आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या सेवेच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतात कारवाई केली आहे, अशी माहिती व्हॉट्सअ‍ॅप कंपनीने दिली.

व्हॉट्सअ‍ॅपने मागील वर्षी १ मार्च ते ३१ मार्चदरम्यान ७,९५४,००० अकाउंट्स बंद केले होते. कंपनीने मागील वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत ६९,३०७,२५४ अकाऊंट्स बंद केले होते.

मागील वर्षी कोणत्या महिन्यात किती अकाऊंट्स बंद करण्यात आले?
  • जानेवारी,२०२३ - २,९१८,०००
  • फेब्रुवारी २०२३ - ४,५९७,४००
  • मार्च २०२३ - ४,७१५,९०६
  • एप्रिल २०२३ - ७,४५२,५००
  • मे २०२३ - ६,५०८,०००
  • जून - २०२३ - ६,६११,७००
  • जुलै - २०२३ - ७,२२८,०००
  • ऑगस्ट २०२३ - ७,४२०,७४८
  • सप्टेंबर २०२३ - ७१,११,०००
  • ऑक्टोबर २०२३ - ७,५४८,०००
  • नोव्हेंबर - २०२३, ७,१९६,०००

दरम्यान, डिंसेबर महिन्याचाही डेटा समोर आल्यास ७ कोटींचा आकडा ओलांडण्याची शक्यता आहे. तर २ कोटी व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हे युजर्सकडून कोणत्याही प्रकारचा रिपोर्ट येण्यापूर्वी बंद केल्याचे व्हॉट्सअ‍ॅपने अधोरेखित केले.

'कंपनीने काही अकाउंट्स बंद केल्याचे आकडे काही प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये चुकीचा वापर आणि युजर्सकडून आलेल्या नकारात्मक अभिप्रायानंतर काही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती व्हॉट्सअ‍ॅपने दिली. व्हॉट्सअ‍ॅपला मागील वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीत ७९,००० तक्रारी युजर्सकडून प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर कारवाई करण्यात आली होती.

या ५ चुकांमुळे तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे खाते बॅन होईल
  • तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरताना थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा वापर करत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवर जीबी व्हॉट्सअ‍ॅप, व्हॉट्सअ‍ॅप प्लस आणि व्हॉट्सअ‍ॅप डेल्टा यांसारख्या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे.
  • एखाद्या नंबरच्या माहितीसह व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट तयार केल्यास कंपनी कारवाई करु शकते. अशा व्हॉट्सअ‍ॅप अंकाउट्सवर कायमस्वरुपी बंदी घातली जाऊ शकते.
  • जर तुम्ही सतत अनोळखी व्यक्तीला मेसेज पाठवत असाल तर तुमचे खाते बॅन केले जाऊ शकते. तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या नंबरवर वारंवार मेसेज पाठवल्यास व्हॉट्सअ‍ॅपच्या अटी आणि नियमांचे उल्लंघन करणे आहे.
  • जर काही लोकांनी तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट रिपोर्ट केले किंवा ब्लॉक केले असेल तर तुमचे खाते बंद होऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅप अशा खातींना बनावट आणि स्पॅम संदेश पसरवणारे समजते.
  • तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कोणालाही बेकायदेशीर संदेश, अश्लील मेसेज किंवा धमकीचे संदेश पाठवल्यास तुमचे खाते बॅन केले जाऊ शकते. कंपनीच्या नियमांविरुद्ध तुम्ही काही चुकीचे केले तर नंबरही बॅन होऊ शकतो.