महाराष्ट्रात रविवारी १ जून २०२५ रोजी ६५ नव्या कोविड-१९ रुग्णांची नोंद झाली. यामुळे १ जानेवारी २०२५ पासूनची रुग्णसंख्या ८१४ वर पोहोचली, असं आरोग्य अधिकाऱ्याने सांगितलं. नव्या रुग्णांपैकी ३१ पुण्यात, २२ मुंबईत, ९ ठाण्यात, २ कोल्हापुरात आणि १ नागपूरात आढळले, असं आरोग्य विभागाने जाहीर केलं.
सध्या राज्यात ५०६ सक्रिय रुग्ण आहेत. ३०० जण बरे झाले. यंदा ८ जणांचा मृत्यू झाला. यापैकी ७ जणांना इतर आजार होते. एका मृत व्यक्तीला हायपोकॅल्सेमिक सीझर्स आणि नेफ्रोटिक सिंड्रोम होता, दुसऱ्याला कर्करोग, तिसऱ्याला सेरेब्रल इन्फार्क्शन, तर चौथ्याला डायबेटिक किटोअॅसिडोसिस आणि श्वसनसंस्थेचा संसर्ग होता. पाचव्या व्यक्तीला इंटरस्टीशियल लंग डिसीज, सहाव्याला २०१४ पासून मधुमेह आणि पक्षाघात, तर सातव्या व्यक्तीला तीव्र ARDS आणि हृदयविकार होता. आठवी मृत व्यक्ती ४७ वर्षीय महिला होती. तिला ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत होता.
मुंबईत १ जानेवारीपासून ४६३ रुग्ण आढळले. जानेवारी आणि फेब्रुवारीत प्रत्येकी १, एप्रिलमध्ये ४ आणि मे मध्ये ४५७ रुग्ण सापडले. मार्चमध्ये एकही रुग्ण नव्हता. राज्यात २०२५ मध्ये ११,५०१ कोविड चाचण्या झाल्या. यापैकी ८१४ नमुने पॉझिटिव्ह आले. सर्व रुग्णांना सौम्य लक्षणं असून त्यांच्यावर नियमित उपचार सुरू आहेत, असं आरोग्य विभागाने सांगितलं.