UAE नंतर आणखी एका मुस्लिम देशात उभं राहणार भव्य मंदिर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 5 Months ago
बीएपीएसचे प्रतिनिधी आणि बहरीनचे क्राऊन प्रिन्स सलमान बिन हमाद अल खलिफा
बीएपीएसचे प्रतिनिधी आणि बहरीनचे क्राऊन प्रिन्स सलमान बिन हमाद अल खलिफा

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ फेब्रुवारी रोजी यूएईच्या अबूधाबी येथे भव्य मंदिराचं उद्घाटन केलं. बोचसनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (बीएपीएस) मंदिराच्या उद्घाटनानंतर आणखी एक मुस्लिम देशात मंदिर बनत आहे. त्या देशाचं नाव आहे बहरीन.

बहरीन येथेही बीएपीएस मंदिर उभारणार आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहण झालेलं असून मंदिर उभारण्यासाठीच्या सगळ्या औपचारिकता पूर्ण झालेल्या आहेत. त्यातच लवकरच मंदिर निर्माणकार्य सुरु होणार आहे.

बहरीन येथे उभारण्यात येणारं मंदिर अबूधाबी येथील मंदिराप्रमाणेच भव्य असेल. या मंदिराचं निर्माण बोचसनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या वतीने होणार आहे. अबूधाबी यथील मंदिराचा खर्च ७०० कोटी इतका आहे. बहरीन इथल्या मंदिरासाठीही भरपूर खर्च होणार आहे. बीएपीएसच्या प्रतिनिधी मंडळाने बहरीनचे क्राऊन प्रिन्स सलमान बिन हमाद अल खलिफा यांची भेट घेतली आहे.

कसं आहे अबूधाबीचं मंदिर?
UAE सरकारने अबुधाबी-दुबई महामार्गावरील अबु मुरेखा भागात दिलेल्या २७ एकर जागेवर मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिराची रचना अत्यंत सुबक करण्यात आली आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंना नदीच्या घाटासारखी बांधणी करण्यात आली असून नदीच्या प्रवाहाप्रमाणे पाणीही सोडण्यात आले आहे. हे पाणी गंगा आणि यमुना नदीतून आणण्यात आले आहे.

या घाटावर बसल्यावर लोकांना वाराणसीप्रमाणे वाटावे, असा उद्देश आहे. गंगा-यमुनेच्या संगमासारखे वातावरण निर्माण करण्यात आले असून दोन्ही बाजूंच्या पाण्याचा प्रवाह जिथे एकत्र येतो, तिथे लेझर किरण सोडून सरस्वती नदीचे अस्तित्वही भासविण्यात आले आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

 

Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter