प्रजासत्ताक दिनानिमित्त बीएसएफच्या जवानांनी पाक रेंजर्सना वाटली मिठाई

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
प्रजासत्ताक दिनानिमित्त बीएसएफच्या जवानांनी पाक रेंजर्सना वाटली मिठाई
प्रजासत्ताक दिनानिमित्त बीएसएफच्या जवानांनी पाक रेंजर्सना वाटली मिठाई

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी पाकिस्तान रेंजर्स आणि बॉर्डर गार्ड बांग्लादेशच्या जवानांना मिठाई वाटप केली. पंजाबच्या अटारी सीमेवर आणि जम्मूमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. त्याचबरोबर,सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी सीमेवर तिरंगा फडकवला. यानंतर दोन्ही राज्यांच्या सीमेवर पाकिस्तान रेंजर्सनी बीएसएफला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ज्यामध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांना मिठाई वाटप करून बंधुभावाचा संदेश दिला.


अटारी येथील भारत-पाकिस्तान सीमेवरील दरवाजे दुपारी उघडण्यात आले. त्यानंतर बीएसएफ आणि पाक रेंजर्सचे जवान सीमेवर जमले. या वेळी बीएसएफ जवानांचे पाकिस्तान रेंजर्सच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त अभिनंदन करण्यात आले. त्याचवेळी दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांना मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘’७४ व्या प्रजासत्ताक दिनी भारत-पाकिस्तानच्या विविध राज्यांच्या सीमेवर तिरंगा फडकवण्यात आला आणि राष्ट्रगीत झाले. त्यानंतर शहिदांना अभिवादन करण्यात आले.”


हे लक्षात घेण्यासारखे आहे की स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या व्यतिरिक्त ईद, होळी, दिवाळी या दिवशी भारत आणि पाकिस्तानमध्ये मिठाईची देवाणघेवाण करण्याची परंपरा आहे. बंधुभावाचा संदेश देण्यासाठी भारत-पाकिस्तानच्या विविध सीमेवर दरवर्षी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात.


भारत-बांग्लादेश सीमेवर प्रजासत्ताक दिन उत्साहात 


पश्चिम बंगालच्या भारत-बांगलादेश सीमेवर बीएसएफने प्रजासत्ताक दिन मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला. यावेळी प्रजासत्ताक दिनी भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या दक्षिण बंगाल फ्रंटियरचे महानिरीक्षक डॉ. अतुल फुलझेले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याचवेळी बीएसएफ आणि बॉर्डर गार्ड बांग्लादेशच्या जवानांनीही मिठाई आणि शुभेच्छांची देवाणघेवाण केली.


दक्षिण बंगाल फ्रंटियर, BSF ने ICP पेट्रापोल, महादीपूर आणि इतर सीमा चौक्यांवर अशाच प्रकारे प्रजासत्ताक दिन साजरा केला. याशिवाय आयसीपी पेट्रापोल येथेही जॉइंट रिट्रीट सेरेमनी आयोजित करण्यात आली होती.


बीएसएफच्या जवानांनी सांगितले की, “दोन्ही देशांच्या सीमा रक्षक दलांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध आहेत. दोन्ही देशांच्या सीमा सुरक्षा दलांमध्ये मिठाईची देवाणघेवाण सद्भावनेचा संकेत म्हणून होते, यातून खरे सहकार्यही दिसून येते. तसेच, सौहार्दपूर्ण संबंध मधुर आणि दृढ होण्यास मदत होते. विशेष म्हणजे दोन्ही सुरक्षा दलांमध्ये सणांच्या निमित्ताने मिठाईची देवाण-घेवाण करून सौहार्दाचे नाते प्रस्थापित करण्याची प्रदीर्घ काळापासून परंपरा आहे.”