जानपीरबाबांचा उत्सव केशवनगरमध्ये उत्साहात साजरा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 8 Months ago
केशवनगर : जानपीरबाबा दर्गाह उत्सवानिमित्त उपस्थित मान्यवर.
केशवनगर : जानपीरबाबा दर्गाह उत्सवानिमित्त उपस्थित मान्यवर.

 

मुंढवा : हिंदू-मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले केशवनगर येथील जानपीरबाबा दर्गाह उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. पहिल्या दिवशी नवीन वस्त्र, चंदन पावडर, फुलांचा शेरा यांची परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. बाबांच्या समाधीचे पूजन करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. जवळपास १२०० भाविकांनी याचा लाभ घेतला.

 

कार्यक्रमाचे आयोजन जानपीरबाबा दर्गाह ट्रस्टचे विश्वस्त रमेश राऊत, जयश्री राऊत, अनिल लोणकर, नंदकुमार कोद्रे, रवींद्र गागडे, शामिक सुतार, श्याम कोंडूर, पुनम गवते, गिरीश गवते आदींनी केले. याप्रसंगी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष जितीन कांबळे, पुणे कॅटोन्मेंट बँकेचे संचालक कैलास कोद्रे, देवेंद्र भाट, अनिल आबनावे, सोमनाथ गायकवाड, प्रशांत जोशी, दादा गायकवाड, प्रशांत भंडारी, शैलेश कलशेट्टी, रमेश कलशेट्टी आदी उपस्थित होते.