हज यात्रेसाठी ऑनलाइन अर्ज भरायला सुरूवात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 7 Months ago
हज यात्रा
हज यात्रा

 

या वर्षीच्या हज यात्रेसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय हज समितीने अर्जासाठी १७ दिवसांची मुदत दिली आहे. याअंतर्गत ४ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल. हज सुविधा ॲप किंवा हज कमिटी ऑफ इंडियाच्या वेबसाइटवरून (http://hajcommittee.gov.in) देखील यात्रेकरू नोंदणी करू शकतात. राज्य हज समितीने याबाबत सूचना जारी केल्या आहेत. हज समितीचे कार्यकारी अधिकारी लियाकत अली यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या प्रवासाचे शुल्क अद्याप ठरलेले नाही."

गेल्या वेळी रियाल (सौदी चलन) न देता वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये ३.५० लाख रुपये शुल्क घेण्यात आले होते. अर्ज करण्यासाठी, अर्जाच्या अंतिम तारखेपूर्वी जारी केलेला व ३१ जानेवारी २०२५ पर्यंत वैध असलेला आंतरराष्ट्रीय पासपोर्ट असणे बंधनकारक आहे. तसेच, प्रत्येक इच्छुक अर्जदाराने अर्ज भरण्यापूर्वी मार्गदर्शक तत्त्वे आणि घोषणा फॉर्म वाचणे आवश्यक आहे. 

हज समितीने जारी केला आदेश 
जिल्हा हज यात्रा समितीचे प्रमुख अयुब डायर यांनी सांगितले की, "सरकार दरवेळी प्रत्येक यात्रेकरूला १५०० ते २१०० रियाल देते. मात्र गेल्या वर्षी ही पद्धत बंद झाली. यात्रेकरूंनी आपल्या स्तरावर सौदी चलन खरेदी करावे, असे हज समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. २०२३ मध्ये झालेल्या हज यात्रेत यात्रेकरूंसाठी अनेक नवीन घोषणा करण्यात आल्या होत्या." 

ही प्रमाणपत्रे आवश्यक असतील
वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र.