उधमपूरच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी बनवल्या राख्या; 'ऑपरेशन सिंदूर'साठी मानले आभार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथील विद्यार्थ्यांनी भारतीय सैनिकांसाठी हाताने राख्या आणि ग्रीटिंग कार्ड्स तयार केली आहेत. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल आणि देशाचे रक्षण केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी विद्यार्थ्यांनी हे केले आहे. यावर्षीचा रक्षाबंधन खास आहे, कारण 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशानंतरचा हा पहिलाच सण आहे.

'ऑपरेशन सिंदूर' हे भारतीय सैन्याने २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू केले होते. या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करण्यात आले होते.

राख्या बनवणाऱ्या विद्यार्थ्यांनी सैनिकांबद्दल अभिमान व्यक्त केला. बाजारातून तयार राख्या विकत घेण्याऐवजी, त्यांनी स्वतःच्या हातांनी राख्या आणि कार्ड्स बनवण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमामुळे देशभक्ती आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना अधिक दृढ झाली आहे.

दरम्यान, भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल माहिती देण्यासाठी आयआयटी जम्मू येथे एक सत्र आयोजित केले होते. याचा उद्देश, दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याच्या भारताच्या धोरणाबद्दल आणि ऑपरेशनमागील रणनीतीबद्दल जागरूकता वाढवणे हा होता.