भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेला संघर्ष अद्याप पूर्णपणे संपलेला नाही, केवळ शस्त्रसंधी लागू झाली असली तरी अनेक पातळ्यांवर हा संघर्ष अद्याप कायम आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिंदू जल करार कधीपर्यंत स्थगित राहील याबाबत भारताची भूमिका परराष्ट्र खात्यानं स्पष्टपणे मांडली आहे. तसंच शस्त्रसंधी लागू करण्यापूर्वी सलग तीन दिवस अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी काय चर्चा झाली? हे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि व्यापारवर रणधीर जयस्वाल पुढे म्हणाले, "7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरु होण्यापासून १० मे रोजी गोळीबार आणि इतर सैन्य कारवाया बंद करण्यावर सहमती होईपर्यंत, भारतीय आणि अमेरिकी नेत्यांमध्ये सैन्यस्थितीवर चर्चा झाली. यामध्ये कुठेही व्यापाराचा मुद्दा उपस्थित झाला नव्हता.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी विदेशी मीडियाला दिलेल्या मुलाखतीवरही जयस्वाल यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटलं की, जिंकल्याचा दावा करण्याची त्यांची जुनी सवय आहे. त्यांनी यापूर्वी 1971, 1975 आणि 1999 च्या कारगिल युद्धावेळी देखील असाच दावा केला होता. पाकिस्तानची ही जुनी सवय आहे की, भलेही पराभूत होऊ पण जिंकल्याचा ढोल वाजवू"
पुढेही म्हणाले, पाकिस्तानच्यावतीनं केलेला दावा आम्ही ऐकला असून ज्या देशानं औद्योगिक स्तरावर दहशतवादाला पाठिंबा दिला. त्याचा हा विचार आहे की ते याच्या परिणामांपासून वाचतील पण ते स्वःलाच मूर्ख बनवत आहेत. पाकिस्तान या गोष्टी जेवढ्या लवकर समजून घेईल तितकं त्यांच्यासाठी चांगल असेल. आपला मोठ्या काळापासून हे राष्ट्रीय धोरण राहिलं आहे की, केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरशी संबंधित कोणत्याही मुद्द्यांना भारत आणि पाकिस्तानला द्विपक्षीय रुपात सोडवावं लागेल. या घोषित धोरणामध्ये कुठलाही बदल होणार नाही, असंही परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.