जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून भारताची नवीन ओळख

Story by  vivek panmand | Published by  vivek panmand • 1 Years ago
नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी

 

 आर्थिक मंदीच्या भीतीमुळे भारताचा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये वाटा वाढणार आहे. तसेच जागतिक अर्थव्यवस्था म्हणून पुढे आलेल्या चीन आणि अमेरिका देशांचा वाटा कमी होणार आहे. IMF च्या मतानुसार जगात असणाऱ्या तीन प्रमुख अर्थव्यवस्थांवर मंदीचा धोका येणार आहे. २०२३ वर्षात आर्थिक महामंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने यासंदर्भातील माहिती दिली आहे. IMF च्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी अमेरिका, युरोप आणि चीनमध्ये मंदी येऊ शकते असे संकेत दिले आहेत. 


दरम्यानच्या काळात अमेरिका, युरोप आणि चीनमध्ये आर्थिक घसरण होत आहे. २०२३ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेतील अमेरिकेचा वाटा कमी होणार असल्याचे आयएमएफचे आकडे सांगत आहेत. भारताचा जागतिक अर्थव्यवस्थेत वाटा वाढणार आहे. भारत जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २०२२ हे वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने खूप महत्वाचे ठरणार आहे. आंतराराष्ट्रीय नाणेनिधीने यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. 


त्यामध्ये सांगण्यात आले आहे की, २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये भारताचा जागतिक अर्थव्यवस्थेतील वाटा ३.६ टक्यांपर्यंत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २००० मध्ये भारताचा वाटा १.४ टक्के होता. याच काळात जागतिक अर्थव्यवस्थेतील अमेरिकेचा वाटा ३०.१ टक्के होता. यंदाच्या वर्षात तो वाटा २४.७ टक्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेने जागतिक पातळीवर पहिल्या ५ अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. २०२२ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था १०० ट्रिलियन डॉलर्स ओलांडून १०१.६ ट्रिलियनवर पोहोचली होती. 


भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून पाचव्या क्रमांकावर मजल मारली आहे. २०२३ मध्ये सर्व आव्हाने असूनही भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये रशिया आणि युक्रेन युद्ध, वाढत्या महागाईचा दबाव आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेसारख्या मध्यवर्ती व्याजदरात झालेली वाढ यामुळे दबाव वाढत चालला आहे. 


भारताच्या अर्थव्यवस्थेत झालेली सुधारणा सकारात्मक गोष्ट आहे. आयएमएमचे मुख्य संशोधक पियरे ओलीविअर गौरीनचास यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये सांगितले होते की, भारत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. सध्याच्या परिस्थितीत भारताचा आर्थिक विकास दर वाढत आहे. भारताचा ६.८ टक्के दराने विकास होणे ही मोठी गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांच्या मतानुसार नवीन वर्ष कठीण असणार आहे. अमेरिका, युरोप आणि चीन या महासत्ता मंदीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपीचा दर ६.३ टक्के होता. आरबीआयच्या आकडेवारीनुसार जून २०२२ मध्ये जीडीपीचा आकडा १३.५ टक्के होता.