इराण-इस्रायल युद्धाच्या भीषण संकटात भारतीयांचा मदतीचा हात; पहिली वैद्यकीय मदत तेहरानला रवाना!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष १९ दिवस पूर्ण होत आहेत. दरम्यान आज भारताने तेहरानला पहिली वैद्यकीय मदत पाठवली आहे. ही मदत मिळाल्यानंतर भारतातील इराणच्या दूतावासाने म्हटले की, "भारतातील सन्माननीय लोकांकडून मिळालेली वैद्यकीय मदतीची पहिली खेप इराणी रेड क्रिसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. आम्ही भारतातील प्रेमळ लोकांचे मनापासून आभार मानतो." 

दूतावासाने भारताने पाठवलेल्या या वैद्यकीय मदतीचा व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. या घटनेला प्रत्युत्तर म्हणून तेहरानने इस्रायल आणि आखाती देशांवर क्षेपणास्त्रे तसेच ड्रोनद्वारे हल्ले केले.
इराणने तेलाच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची ये-जा थांबवली आहे. जागतिक ऊर्जा संकटाबद्दल चिंता वाढत असतानाच, एका इराणी अधिकाऱ्याने सांगितले की, या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीवरील आपले नियंत्रण सोडण्याचा तेहरानचा कोणताही विचार नाही.