परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आजपासून मॉरिशस आणि युएई दौऱ्यावर; हिंदी महासागर परिषदेत होणार सहभागी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

 

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आजपासून मॉरिशस आणि संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात डॉ. जयशंकर ९ व्या हिंदी महासागर परिषदेत सहभागी होण्यासाठी मॉरिशसला भेट देतील.

या भेटीदरम्यान परराष्ट्र मंत्री मॉरिशसच्या नेतृत्वाची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण व्याप्तीचा आढावा घेतील. तसेच ते ९ व्या हिंदी महासागर परिषदेत बीजभाषण करतील. या परिषदेच्या निमित्ताने डॉ. जयशंकर इतर सहभागी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. ही भेट भारताचे शेजारी प्रथम धोरण, सागर (MAHASAGAR) दृष्टिकोन आणि ग्लोबल साऊथप्रती असलेली कटिबद्धता अधोरेखित करते.

दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात परराष्ट्र मंत्री ११ ते १२ एप्रिल दरम्यान संयुक्त अरब अमिरातीला भेट देतील. या भेटीत डॉ. जयशंकर युएईच्या नेतृत्वाची भेट घेऊन दोन्ही देशांमधील घनिष्ठ सहकार्याचा आढावा घेतील आणि सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत चर्चा करतील.