राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कमध्ये अखेर मिझोरामचा ‘असा’ झाला समवेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 13 d ago
मिझोराममधील बैरबी-सैरंग रेल्वे मार्ग
मिझोराममधील बैरबी-सैरंग रेल्वे मार्ग

 

मिझोराममधील बैरबी-सैरंग रेल्वे मार्ग मंगळवारी सुरू झाला. यामुळे मिझोराम राज्य राष्ट्रीय रेल्वे जाळ्यात पूर्णपणे समाविष्ट झाले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ५१.३८ किलोमीटरचा हा ब्रॉड गेज मार्ग रेल्वे सुरक्षा आयोगाच्या तपासणीनंतर अधिकृतपणे सुरू झाला.

रेल्वे सुरक्षा आयुक्त (ईशान्य सीमा मंडळ) सुमीत सिंघल यांनी ६ ते १० जून दरम्यान हॉर्टोकी ते सैरंग या ३३.८६ किलोमीटरच्या अंतिम टप्प्याची तपासणी केली. ईशान्य सीमा रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कपिंजल किशोर शर्मा यांनी सांगितले की, हा मार्ग आता तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर लवकरच गाड्या सुरू होतील. औपचारिक उद्घाटन येत्या काही दिवसांत होईल.

हॉर्टोकी-सैरंग हा टप्पा डोंगराळ भागातून जातो. यात ३२ बोगदे आणि ३५ मोठे पूल आहेत. या मार्गामुळे आइझॉलला प्रथमच थेट रेल्वे जोडणी मिळाली आहे. या प्रकल्पामुळे प्रवासी आणि मालवाहतूक वाढेल, सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि मिझोरामच्या नागरिकांची दीर्घकालीन आकांक्षा पूर्ण होईल, असे शर्मा म्हणाले. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter