पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ७५ रुपयांचे नाणे जारी; एनसीसीच्या कार्यक्रमात केली घोषणा

Story by  vivek panmand | Published by  vivek panmand • 1 Years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी नाण्याचे वितरण करताना
पंतप्रधान नरेंद्र मोदी नाण्याचे वितरण करताना

 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७५ रुपयांचे स्मारक नाणे जारी करण्यात आले आहे. नॅशनल कॅडेट कोर्प्स ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे विशेष नाणे प्रकाशित करण्यात आले आहे. एनसीसीच्या पीएम रॅलीनंतर हा कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमाला १९ देशांतील ११६ अधिकारी आणि कॅडेट्स सहभागी झाले होते. 


या कार्यक्रमाला १९ देशांमधील १९६ अधिकारी आणि कॅडेट्स सहभागी झाले होते. यावेळी मोदी यांनी म्हटले आहे की, “स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या काळात एनसीसीदेखील आपला ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या ७५ वर्षांच्या काळात ज्या लोकांनी प्रतिनिधित्व केले, ते याचा भाग राहिले आहेत. राष्ट्रनिर्माणच्या कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे. 


आपण एनसीसी कॅडेटच्या रूपात आणि देशातील तरुणांच्या रूपात एक अमृत पिढीचे नेतृत्व करत आहात. ही अमृत पिढी येणाऱ्या काळात २५ वर्षात देशाला एका नव्या उंचीवर पोहचवेल. भारताला आत्मनिर्भर आणि विकसित बनवेल. आता भारताचा काळ आला आहे. प्रत्येकजण भारताची चर्चा करत आहे. याच श्रेय भारताच्या तरुणांना देण्यात येईल.