NIA ने महाराष्ट्रात केली 'ही' कारवाई

Story by  आवाज़ मराठी | Published by  Sameer Shaikh • 26 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

राष्ट्रीय तपास एजन्सी NIA ने नुकतेच सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आणि स्थानिक पोलिसांसह आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक सिंडिकेटवर संयुक्त कारवाई केली. दरम्यान यामध्ये सहभागी असलेल्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या पाच जणांवर नोकरीचे खोटे आश्वासन देऊन भारतीय तरुणांना परदेशात नेल्याचा आरोप आहे.

तरुणांना लाओस, गोल्डन ट्रँगल एसईझेड आणि कंबोडिया यासह इतर ठिकाणी बनावट कॉल सेंटरमध्ये काम करण्यास भाग पाडले जात होते, हे मुख्यतः परदेशी नागरिकांद्वारे नियंत्रित आणि चालवल्या जाणाऱ्या रॅकेटचा एक भाग आहे. बहुराज्यीय कारवाईचा एक भाग म्हणून एनआयएने छापा टाकून पाच जणांना अटक केली.

ज्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांवर छापे टाकण्यात आले त्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, दिल्ली, हरियाणा आणि पंजाब यांचा समावेश आहे. या राज्यांच्या अनेक भागात छापे टाकण्यात आले आणि आठ नवीन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. अटक केलेल्या पाच आरोपींमध्ये वडोदरा येथील मनीष हिंगू, गोपालगंजचे पहलाद सिंग, दक्षिण पश्चिम दिल्लीचे नबियालम रे, गुरुग्रामचे बलवंत कटारिया आणि चंदीगडचे सरताज सिंग यांना अटक करण्यात आली.

एनआयएच्या तपासात असे दिसून आले की, आरोपी एका संघटित तस्करी सिंडिकेटमध्ये सामील होते, जे भारतीय तरुणांना आमिष दाखवत होते आणि कायदेशीर नोकरीच्या खोट्या आश्वासनावर त्यांची विदेशात तस्करी करत होते.

खरेतर, हे संघटित तस्करी करणारे सिंडिकेट भारतीय तरुणांना क्रेडिट कार्ड फसवणूक, बनावट ॲप्लिकेशन वापरून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणे, हनी ट्रॅपिंग इत्यादी बेकायदेशीर कृत्ये ऑनलाइन करण्यास भाग पाडत होते.