कठीण काळातही भारताची 'सुधारणा एक्सप्रेस' सुसाट - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पाहणी अहवालाचे वर्णन भारताच्या 'सुधारणा एक्सप्रेस'चे सर्वसमावेशक चित्र असे केले आहे. आव्हानात्मक जागतिक परिस्थितीतही भारताने सातत्यपूर्ण प्रगती केली असून हेच या अहवालातून प्रतिबिंबित होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी सर्वांना हा अहवाल वाचण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. ते म्हणतात, "आर्थिक पाहणी अहवाल आपल्या अर्थव्यवस्थेचे विद्यमान सामर्थ्य अधोरेखित करतो. तसेच यातून भविष्याविषयीचा व्यापक आशावाद दिसून येतो. कठीण जागतिक परिस्थितीतही भारताच्या 'सुधारणा एक्सप्रेस'ने केलेल्या सातत्यपूर्ण प्रगतीचे हे एक सर्वसमावेशक चित्र आहे."

पंतप्रधानांनी पुढे नमूद केले की, "हा अहवाल आपल्या देशातील तरुणांसाठी नवीन संधी निर्माण करण्याचे मार्गही स्पष्ट करतो. त्यामुळे मी सर्वांना हा अहवाल वाचण्याचे आवाहन करतो."

जागतिक अर्थव्यवस्थेत चढ-उतार सुरू असतानाही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असल्याचे या अहवालातून दिसून येते, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.