देशात केवळ चार टक्के गोड्या पाण्याचे स्रोत - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

‘‘देशात केवळ चार टक्के गोड्या पाण्याचे स्रोत आहेत, त्यामुळे देशवासीयांनी पाण्याचा वापर जपून करायला हवा,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना केले. ‘पाण्याचा वापर कमी करा, पाण्याचा पुनर्वापर करा आणि पाण्याचे पुनर्भरण तसेच पुनर्चक्रिकरण करा’ हे सूत्र सर्वांनी आत्मसात करायला हवे, असे आवाहन मोदी यांनी केले.

सुरत येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जलसंचय जन भागीदारी या कार्यक्रमात मोदी यांनी व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थितांना संबोधित केले. ‘‘जलसंवर्धन आणि पर्यावरणाचे संरक्षण हे भारतीयांच्या संस्कृतीचाच एक भाग असून, आपण पाण्याला देवता मानतो तर नदीची देवी म्हणून पूजा करतो,’’ असे प्रतिपादन मोदी यांनी केले. देशातील सुमारे ८० पाणीसाठ्याचा उपयोग हा शेतीसाठी करण्यात येतो त्यामुळे ठिबक सिंचनासारख्या तंत्राचा वापर करणे आवश्‍यक असून त्याचा अधिकाधिक प्रसार झाला पाहिजे, असे मत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केले.

जलसंधारणाच्या चळवळीत केवळ सरकारची धोरणेच नव्हे तर सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून होणारा लोकसहभागही महत्त्वाची भूमिका बजावतो मागील कित्येक दशकांपासून जलसंधारण आणि नद्यांच्या संरक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले मात्र, प्रत्यक्ष परिणाम हे मागील दहा वर्षांच्या काळातच दिसले ३देशातील ७५ टक्के घरांत आता नळाद्वारे शुद्ध पाणी येते ४घराघरांत शुद्ध पाणी पोहोचविल्याने देशातील सर्व नागरिकांचे मिळून एकूण साडेपाच लाख तास वाचतात ५जल जीवन मिशनमुळे घराघरांत शुद्ध पाणी पोहोचल्याने दूषित पाण्याने होणाऱ्या आजारांपासून प्रतिवर्षी चार लाख जणांचा जीव वाचविण्यात सरकारला यश