आवाज द व्हॉइस/ नवी दिल्ली
भारताने पाकिस्तानचे F-16 लढाऊ विमान पाडले असून 8 ड्रोन आणि क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात आली आहेत. जम्मूवर पाकिस्तानने डागलेली अनेक क्षेपणास्त्रे भारताच्या मजबूत हवाई संरक्षण यंत्रणेने यशस्वीपणे रोखली आहेत.
पाकिस्तानकडून तणाव वाढवण्याचा प्रयत्न
काही वेळापूर्वी जम्मू, आरएस पुरा, चानी हिम्मत आणि आसपासच्या परिसरातील लष्करी आणि नागरी स्थळांना लक्ष्य करून पाकिस्तानने अनेक क्षेपणास्त्रे डागली. मात्र, भारताच्या अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेमध्ये S-400 आणि आकाश प्रणालींचा समावेश आहे, ज्यांनी पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना यशस्वीपणे नष्ट केले.
8 ड्रोन आणि क्षेपणास्त्रे नष्ट
प्राथमिक अहवालांनुसार, भारताने एकूण 8 ड्रोन किंवा क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली.
F-16 विमान पाडले
भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने मोठ्या हवाई घुसखोरीचा प्रयत्नही हाणून पाडला. पाकिस्तानचे F-16 लढाऊ विमान सरगोधा येथून उड्डाण करून जम्मूकडे येत होते. जम्मू विमानतळावर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि भारतीय सैन्याने तातडीने कारवाई करत हे विमान पाडले.
राजस्थानातही ड्रोन रोखले
जम्मू व्यतिरिक्त, पाकिस्तानी ड्रोनने राजस्थानातील जैसलमेर येथेही घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने त्यांना यशस्वीपणे निष्क्रिय केले.
सीमावर्ती भागात तणाव
जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थानसह सीमावर्ती राज्यांमध्ये सुरक्षा परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. भारतीय सैन्य पाकिस्तानच्या कोणत्याही आगळीकीला आणि भारतीय हद्दीतील लष्करी तसेच नागरी स्थळांना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नांना निष्फळ करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.
ब्लॅकआउट लागू
दरम्यान, जम्मू, आरएस पुरा, अमृतसर, पुंछ, जैसलमेर आणि आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या इतर भागांमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे.
भारताची सतर्कता